नितेश राणे यांनी आज अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. कणकवली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारसभेसाठी दाखल होताच नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केलं. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला. या दिवसाची मी फार दिवस वाट पाहात होतो असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. माझ्यासह निलेश राणे, नितेश राणे यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाला असे मी जाहीर करतो असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

नितेश राणे हे कणकवलीतून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन नारायण राणे यांनी यावेळी केलं. दरम्यान राज्यभरात युती असलेले शिवसेना आणि भाजपा यांची युती असली तरीही कणकवलीत मात्र कुस्ती आहे हे दिसून आलं आहे. कारण नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. नारायण राणे पक्षात आलेच होते, राज्यसभेत ते भाजपाचे खासदार आहेत हे मी सगळ्यांना सांगतच होतो. त्यांच्या स्वाभिमान संघटनेचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश झाला हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

What Omar Abdullah Said?
“८० टक्के हिंदूंना १४ टक्के मुस्लिमांकडून धोका कसला?”, मोदींच्या वक्तव्यावर ओमर अब्दुल्लांचा उद्विग्न सवाल
elon musk postpones trip to india
‘टेस्ला’चे मस्क यांचा भारत दौरा लांबणीवर; वर्षअखेरीस भेटीचे सुतोवाच
Dharamrao Baba Atram vijay wadettiwar
“विजय वडेट्टीवारांनी भाजपा प्रवेशासाठी…”, धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ भेटीचा खुलासा करत म्हणाले…
Former corporator Leena Garad suspended by BJP joins Thackeray groups Shiv Sena
भाजपच्या निलंबीत माजी नगरसेविकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबईत हा प्रवेश करायचा नाही तर कणकवलीत हा प्रवेश सोहळा होईल असं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे आज ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. मी आमदार असताना नारायण राणे विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं, यापुढेही त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल यात काहीही शंका नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.