News Flash

ज्याचे वडील तुरुंगात आहेत असा कोणी दुष्यंत इथे नाही; संजय राऊतांचा भाजपाला इशारा

हरयाणात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदांचेही वाटप झाले आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदावरुन वाटाघाटी सुरुच आहेत.

संजय राऊत

हरयाणा आणि महाराष्ट्रात एकाच वेळी मतदान झाले आणि निकालही लागले. मात्र, हरयाणात सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण झाली, ती अद्याप महाराष्ट्रात झालेली नाही. राज्यात शिवसेना-भाजपामध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद घेण्यावरुन सध्या सत्तास्थापनेचा दावा अडून राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. हरयाणाप्रमाणे इथे असा कोणीही दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

भाजपा-शिवसेनेत निवडणूकपूर्व युती असतानाही राज्यात सत्तास्थापनेसाठी इतका वेळ का लागत आहे? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “इथे असा कोणीही दुष्यंत नाही ज्याचे वडील तुरुंगात आहेत. इथे शिवसेना आहे जी धर्म आणि सत्य यावर राजकारण करते. शरद पवार ज्यांनी राज्यात भाजपाविरोधात वातावरण तयार केले आहे. तसेच काँग्रेस कधीही भाजपासोबत जाणार नाही.” या विधानाद्वारे राऊत यांनी हरयाणात उपमुख्यमंत्री झालेले दुष्यंत चौटाला यांच्याप्रमाणे आमची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे शिवसेनेसमोर इतर पर्याय खुले असल्याचे सूचकरित्या म्हटले आहे.

“उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच म्हटले की, आम्हाला इतर पर्याय खुले आहेत. मात्र, तो पर्याय स्विकारण्याचे पाप आम्हाला करायचे नाही. शिवसेनेने कायमच न्यायाचे राजकारण केले आहे. आम्ही सत्तेचे भुकेले नाही,” असेही राऊत यांनी शिवसेनेची भुमिका मांडताना म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानावर हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिला आहे. चौटाला म्हणाले, “राऊतांच्या विधानावरुन हे कळते की त्यांना दुष्यंत चौटाला कोण आहे हे माहिती आहे. माझे वडील अजय चौटाला हे गेल्या ६ वर्षांपासून तुरुंगात आहेत मात्र, राऊतांनी कधीही त्यांची चौकशी केली नाही. अजय चौटाला आपली शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय तुरुंगातून बाहेर येणार नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांना अशी विधानं करणं शोभत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 1:55 pm

Web Title: no one dushyant is here whose father is in jail sanjay raut warns bjp aau 85
Next Stories
1 राज कुंद्रा अडचणीत, इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणी ईडीकडून समन्स
2 सत्ताफराळासाठी गाठीभेटी!
3 अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे सचिवांना आदेश
Just Now!
X