राजकीय उदासीनतेविरोधात खारघर, तळोजा, रोडपाली नोडमध्ये रहिवाशांची चळवळ

गेली तीन वर्षे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी यावेळी विधानसभेच्या निवडणूकीत मतदान न करण्याची भूमिका घेतली आहे. खारघर, तळोजा आणि रोडपाली या तीन वसाहतींमधील रहिवाशांनी ही चळवळ सुरू केली आहे.

Finance Minister Nirmala Sitharaman
अर्थमंत्री निर्मला सीतारमण निवडणूक लढविणार नाहीत; म्हणाल्या, “माझ्याकडे पैसे नाही…”
Due to Shiv Senas aggressiveness Congress defeat in Mahavikas Aghadi
शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट
Dharashiv Lok Sabha
सागर बंगल्यावर धाराशिवच्या उमेदवारीसाठी रांग, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तोडगा काढण्याचे आव्हान
Code of Conduct in Thane
ठाण्यात आचारसंहितेचा भंग, मतदारांना योजनांच्या माध्यमातून प्रलोभने देण्याचा उमेदवारांचा प्रयत्न

१५ दिवसांपासून सुरू केलेल्या मोहिमेत मतदानावर बहिष्कार किंवा नोटा चिन्हावर मतदानाची कळ दाबणाऱ्यांची संख्या परिसरात वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. असे असले तरीनिवडणूक आयोग वा लोकप्रतिनिधींनी संतप्त मतदारांची मनधरणीचा प्रयत्न अद्याप केला नाही.

तीन वर्षांपासून खारघर वसाहतीमधील सेक्टर-३४ सी या परिसरातील नागरिक पाण्याच्या संकटाला तोंड देत आहेत.  ५० कुटुंबे राहत असलेल्या इमारतीला दिवसातून अपुरा पाणी पुरवठा होत आहे. वेळोवेळी सिडको मंडळाकडे तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.

सेक्टर ३४ येथील नागरिक संदीप खाकसे हे सरस्वती इन्क्लेव्ह गृहनिर्माण सोसायटीत राहतात. त्यांच्यासह असंख्य नागरिकांनी पाणी आणि रस्ते पायाभूत सुविधा मिळत नसल्याने ही भूमिका घेतली. दीड महिन्यापासून या मोहिमेत सेक्टर ३४ मधील ए, बी. सी या गटातील विविध इमारतींमधील नागरिक जोडले जात आहेत. सध्या समाजमाध्यमांवर  माध्यमातून हे खारघरवासिय पाण्यासाठी चळवळ  सुरू केली आहे.

‘पाणी नसलेले नियोजित शहर’

पाण्याची खूप अडचण आहे. सेक्टर २ मधील कैलास कॉम्पलेक्स या इमारतीमध्ये राहतात. २८ सदनिका आमच्या येथे आहेत. महिन्याचे दोन आठवडे कसेबसे पाणी पुरते मात्र शेवटच्या आठवडय़ात प्रत्येकवेळी पाण्याचा टॅंकर मागवावा लागतो. सूमारे पाच टॅंकर पाणी आमची सोसायटी पैसे भरुन मागवते. यामुळे गृहिणी नियोजन करुन घर चालवितात. आमच्या वसाहतीमध्ये अनेकांची ही स्थिती आहे. २०१२ पासून मी येथे राहतो आणि वसाहतीच्या स्थापनेपासूनच ही अडचण आहे. अनेकजणांनी लेखी तक्रारी केल्या. मात्र काहीही होत नसल्याने आम्ही पाणी द्या आम्ही मतदान करु ही भूमिका घेतली. माझ्यासारखे अनेकांनी समाजमाध्यमांवर ही भूमिका जाहीर केली. पाण्याशिवाय माणसाने जगावे कसे ही नियोजित शहर बांधणाऱ्यांना समजले पाहीजे. असे तळोजा येथील विश्वनाथ काळे यांनी सांगितले.

आम्ही मुंबईपेक्षा जास्त कर विविध रुपात येथे दिल्यानंतर सदनिका खरेदी केल्या. त्यानंतरही पाण्यासारखी मुलभूत गरज पूर्ण झालेली नाही. त्यामुळे काहींनी बहिष्कारापेक्षा मतदान यंत्रातील नोटाचा पर्याय निवडण्याचे सूचविले.  -संदीप खाकसे, खारघर, नागरिक