राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून शिवसेना भाजपानं बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपाला १०५, शिवसेनेला ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४, काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला आहे. यावेळी निकालातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. यावेळी विधानभवनात महिला आमदारांची संख्या अधिक असल्याचं दिसत आहे. गेल्या निवडणुकीत विधानसभेतील महिला आमदारांची संख्या २० होती. यावर्षी त्यात वाढ झाली असून आता २४ महिला आमदार विधानसभेत आपापल्या मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत.
दरम्यान, यावेळी भाजपाच्या १२ महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. तर शिवसेनेच्या २,काँग्रेसच्या ५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३ आणि २ अपक्ष महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. यावेळी पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जवळपास २३५ महिला उमेदवार रिंगण्यात उतरल्या होत्या. त्यापैकी आता २४ महिला उमेदवार आपल्या मतदारसंघाचं विधानसभेत नेतृत्व करणार आहेत.
ही आहे महिला उमेदवारांची यादी
भाजपा
१. मंदा म्हात्रे – बेलापूर
२. मनिषा चौधरी – दहिसर
३. विद्या ठाकूर – गोरेगाव
४. भारती लव्हेकर – वर्सोवा
५. माधुरी मिसाळ – पर्वती
६. मुक्ता टिळक – कसबापेठ
७. देवयानी फरांदे – नाशिक मध्य
८. सीमा हिरे – नाशिक पश्चिम
९. श्वेता महाले – चिखली
१०. मेघना बोर्डीकर – जिंतूर
११. नमिता मुंदडा – केज
१२. मोनिका राजळे – शेवगाव
शिवसेना
१. यामिनी जाधव – भायखळा
२. लता सोनवणे – चोपडा
काँग्रेस
१. वर्षा गायकवाड – धारावी
२. प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य
३. प्रतिभा धानोरकर – वरोरा
४. सुलभा खोडके – अमरावती
५. यशोमती ठाकूर – तिवसा
राष्ट्रवादी काँग्रेस
१. सरोज अहिरे – देवळाली
२. सुमनताई पाटील – तासगाव-कवठेमहंकाळ
३. अदिती तटकरे – श्रीवर्धन
अपक्ष
१. गीता जैन, भाजप बंडखोर – मीरा-भाईंदर
२. मंजुळा गावित – साक्री
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2019 10:15 am