केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी करवा चौथ सण साजरा करण्यासाठी वाहन वाहतूक टाळून मुंबई लोकलने प्रवास केला. त्यांचा लोकल प्रवास हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे भाजपा पक्षातील मोठे नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार सभेत उपस्थित राहत आहेत. मीरा भाईंदर मतदार संघ १४५  मध्ये भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या प्रचाराकरिता पियुष गोयल यांनी मिरा भाईंदर मध्ये हजेरी लावली. त्यानंतर आज करवा चौथ असल्यामुळे त्यांनी वाहतूक कोंडीत न अडकता रेल्वे ने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. भाईंदर स्थानकापासून ग्रँटरोड पर्यंत चा प्रवास केल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.