राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पिंपरी-चिंचवडमधील तीन सभा आज रद्द कराव्या लागल्या. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा असल्याने हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली होती. दरम्यान, प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. इतर पक्षांना प्रचार करण्यास नाकारलं जात आहे, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे? याविषयी संभ्रम निर्माण होत असल्याची खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि स्टार प्रचारक अमोल कोल्हे यांच्या सभांचे आज पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आले होते . मात्र, ऐनवेळी सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे परिसरात असल्याने सभेला येऊ शकलो नाही. हेलिकॉप्टर उड्डाण घेण्यासाठीच्या परवानगी नाकारण्यात आली आहे. चोपडा, पाईट, भोसरी, पिंपरी, चिंचवड, येथील सभा रद्द झाल्या आहेत. पुणे परिसरात पंतप्रधान असल्याने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. पण खरोखर प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही की, जर देशाचे पंतप्रधान पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी येत असतील तर त्या प्रोटोकॉलमुळे इतर पक्षांना प्रचारापासून वंचित ठेवण्यात येत आहे.

इतर पक्षांना प्रचार करण्यास नाकारलं जात आहे, हे कितपत लोकशाहीच्या तत्वांना आणि मूल्यांना धरून आहे याविषयी संभ्रम निर्माण होत आहे, अस ते सांगतात. सभा रद्द झाल्याने खासदार अमोल कोल्हे यांनी सभेच्या ठिकाणी उपस्थित झालेल्या नागरिकांची माफी मागितली आहे. खेड आळंदी, भोसरी, पिंपरी, चिंचवड येथील उमेदवारांना शुभेच्छा देत दिलगिरी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत आणि पुरस्कृत उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं अस आवाहन खासदार कोल्हे यांनी केलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm amol kolhes three meetings canceled due to pms protocol msr
First published on: 17-10-2019 at 20:28 IST