19 September 2020

News Flash

मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार करणं दुर्दैवी – नरेंद्र मोदी

"शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटत असेल तर ही त्यांची इच्छा"

जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यावरून टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नाशिकच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली.

“काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

“काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

राम मंदिर प्रकऱणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा – नरेंद्र मोदी
गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत ? सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ? आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:42 pm

Web Title: pm narendra modi ncp sharad pawar jammu kashmir article 370 maharashtra assembly election sgy 87
Next Stories
1 ममता बॅनर्जींनी या खास कारणांसाठी प्रथमच घेतली गृहमंत्र्यांची भेट!
2 “इम्रान खान, तुम्ही कटोरा घेऊन जगभरात भीक मागायला सुरुवात करा”
3 कार खरेदीकडे ‘नवतरुणांचा’ कल का कमी? ‘मारुती’च्या अध्यक्षांनी सांगितलं कारण
Just Now!
X