निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिले ठाकरे म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घेतले जाईल हे आता स्पष्ट झालं आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत. २०१० मध्ये युवासेनेची स्थापना झाल्यानंतर युवासेना प्रमुख म्हणून सुरु झालेला आदित्य ठाकरेंचा प्रवास हा भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतर्फे करण्यात येणाऱ्या दाव्यापर्यंत पोहचला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसा आहे आदित्य ठाकरेंचा राजकारणातील प्रवास…

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील असं भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील प्रतिनिधी मंडळ आणि भाजपाचे केंद्रीय मंडळच घेईल असं शाह यांनी स्पष्ट केलं आहे. यामाध्यमातून मुख्यमंत्रीच काय उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेच्या मतला फारशी किंमत नसल्याचे स्पष्ट संकेत शाह यांनी दिले आहेत.