25 May 2020

News Flash

प्रदीप शर्मा यांची मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दमदाटी

चंदनसार मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि मतदान केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

विरार : विरारच्या चंदनसार मतदान केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि मतदान केंद्र अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या प्रकरणी मतदान केंद्रअधिकाऱ्यांनी शर्मा यांच्याविरोधात तक्रार दिली.  सकाळी ११ वाजताच्या सुमारास विरार पुर्वेच्या चंदनसार येथील क्रमांक६७ या मतदान केंद्रावर  शर्मा हेअंगरक्षक आणि कार्यकर्त्यांसह आले होते. त्यावेळी या केंद्रातील मतदान केंद्र क्रमांक ११ येथे प्रदीप शर्मा आणि निवडणूक अधिकारी बाळकृष्ण मालोदे यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी प्रदीप शर्मा यांनी दमदाटी करून मतदान प्रक्रियेत व्यत्यय आणला असा आरोप मालोदे यांनी केला. याबाबत प्रदीप शर्मा यांनी सारे आरोप फेटाळून लावले असा आणि असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 12:01 am

Web Title: pradeep sharma dispute among polling booth officers zws 70
Next Stories
1 वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मुलांनी गाठलं मतदान केंद्र, अस्थी घेऊन पोहोचली मतदानाला
2 ठाणे : मतदानावेळी ‘ईव्हीएम’वर शाई फेकून नोंदवला निषेध
3 पालघर : वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट, दोन तासात एकही टक्का मतदान नाही
Just Now!
X