News Flash

भाजपचे प्रशांत ठाकूर सर्वात श्रीमंत उमेदवार

श्रीवर्धनच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या नावावर ३९ लाखांचीच मालमत्ता आहे.

आदिती तटकरेंकडे ३९ लाखांची मालमत्ता

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. सात मतदारसंघासाठी ११२ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातील माहिती नुसार पनवेल मधून भाजपचे प्रशांत ठाकूर हे जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. तर श्रीवर्धनच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या नावावर ३९ लाखांचीच मालमत्ता आहे.

प्रस्तापित पक्षांनी उभे केलेले बहुतांश उमेदवार करोडपती आहेत. महत्वाची बाब म्हणजे बहुतांश उमेदवारांची शैक्षणिक पात्रता कमी आहे. आणि अनेक उमेदवारांवर निरनिराळे गुन्हेही दाखल आहेत. मात्र काही प्रकरणात दोषारोप पत्र दाखल असले तरी हि सर्व प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत.

कर्जत विधासभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुरेश लाड आणि शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांच्यात प्रमुख लढत आहे. आमदार सुरेश लाड यांच्या नावावर २२ कोटी ४ लाख रुपयांची स्थावर तर २० लाख ८० हजार जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर १ कोटी ४२ लाखांची मालमत्ता आहे. लाड यांच्यावर करोडो रुपयांचे कर्ज आणि चार गुन्हेही दाखल आहेत. शिवसेना उमेदवार महेंद्र थोरवे यांच्याकडे  ६८ लाख ६२ हजार जंगम तर १७ कोटी ९७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ३१ लाख १० हजार रुपयांची जंगम तर ९२ लाख ६ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. थोरवे यांच्यावर १ कोटी ६१ लाख रुपयांचे तर       पत्नीच्या नावावर ८१ लाख रुपयांचे दायित्व आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रशांत ठाकूर आणि शेकापचे हरेश केणी यांच्यात प्रमुख लढत आहे. प्रशांत ठाकूर यांच्याकडे ३६ कोटीची जंगम तर ५५ कोटी ४१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर १० कोटी जंगम तर ७९ कोटी ७२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. ठाकूर यांच्या विरोधात शेकापचे हरेश केणी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे २ कोटी ९४ लाख जंगम तर ६ कोटी ९६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ४५ लाख ४३ हजार मालमत्ता असून केणी यांच्यावर   ४० लाखांचे दायित्व आहे.

उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे मनोहर भोईर, शेकापचे विवेक पाटील आणि भाजपचे अपक्ष बंडखोर उमेदवार महेश बालदी निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या मनोहर भोईर यांच्याकडे १९ कोटी ८६ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर ११ कोटी २२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे २९ लाख ३ हजार रुपयांची जंगम तर ७५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शेकापच्या विवेक पाटील यांच्याकडे १४ कोटी १५ लाख रुपयांची जंगम तर १५ कोटी ९९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १३ कोटी ६५ लाख जंगम तर १९ कोटी २२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पाटील यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे दायित्व आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी पण कोट्याधीश आहेत. त्यांच्याकडे ५२ लाख ७ हजार रुपयांची जंगम तर ३३ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर १० लाख ८५ हजार रुपयांची मालमत्ता आहे.

अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत अपेक्षीत आहे. तिनही पक्षांचे उमेदवार कोट्याधीश आहेत. शेकाप आमदार सुभाष पाटील यांच्याकडे ६४ लाख ६२ हजार जंगम तर १० कोटी १५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर ४७ लाख ८३ हजार जंगम तर ५ कोटी ९९ लाख ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर ४४ हजारांचे दायित्व आहे. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचेकडे ५० लाख ५९ हजार रुपयांची जंगम तर १७ कोटी १२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या १ कोटी ७७ लाख रुपयांची जंगम तर १३ कोटी १२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दोघांवरही कोट्यावधीचे दायित्व आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मधूकर ठाकूर कोट्याधिश आहेत. त्यांच्याकडे 33 कोटी ८१ लाख रुपयांची जंगम तर ३१ कोटी ५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे २ कोटी २ लाखांची जंगम आणि १ कोटी ५० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर १ कोटी २१ लाखांचे दायित्व आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार श्रध्दा ठाकूर  यांच्याकडे ९८ लाख ६५ हजार रुपयांची जंगम मालमत्ता तर ३५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पतीच्या नावे ३९ लाख ६० हजार रुपयांची जंगम तर १८ लाख ६० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. दोघांवर जवळपास २९ लाखांचे दायित्व आहे.

श्रीवर्धनचे शिवसेना उमेदवार विनोद घोसाळकर यांच्याकडे १ कोटी ४३ लाख रुपयांची जंगम तर २ कोटी १४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्याच्या पत्नीच्या नावे १ कोटी ५६ लाख रुपयांची जंगम तर ३ कोटी १९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. घोसाळकर यांच्यावर ३९ लाख १६ हजार रुपयांचे दायित्व आहे. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारया राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे ३९ लाख १४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर कुठलीच स्थावर मालमत्ता नाही. त्यांच्यानावावर गाडीही नसल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात नमुद केले आहे.

पेणचे शेकाप आमदार धर्यशील पाटील  याचे कडे ९७ लाख ५४ हजार रुपयांची तर १ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी निलीमा पाटील यांच्या नावावर ४५ लाख ३२ हजार रुपयांची जंगम तर ८५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. शिवाय २२ लाखांचे दायित्वही आहे. त्याच्या समोर निवडणूक लढविण्याऱ्े भाजपचे उमेदवार माजी मंत्री रिवद्र पाटील यांचे कडे ३६ लाख ३८ हजार रुपयांची जंगम तर १ कोटी ६५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचे पत्नीच्या नावावर ८० लाख ५८ हजार रुपयांची जंगम तर ७ कोटी ८५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचेवर १९ लाख रुपयांचे दायित्वही आहे.

महाडचे माजी आमदार आणि काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांचेकडे १ कोटी १३ लाख रुपयांची जंगम तर २ कोटी ५४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीचे नावे ६० लाख ६९ हजारांची जंगम तर ४ कोटी ७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. कोट्यावधीचे दायित्व आहे. शिवसेनेचे महाडचे आमदार आणि विद्यमान उमेदवार भरत गोगावले यांचेकडे १५ लाख ८३ हजार रुपयांची जंगम ८४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.त्यांच्या पत्नीच्या नावे १ कोटी ४ लाख रुपयांची जंगम तर ८४ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मुलाच्या नावावर ४६ लाखांची मालमत्ता आहे. दायित्वही मोठ्या प्रमाणात आहे. एकुणच सर्वच राजकीय पक्षांनी भक्कम आर्थिक स्थिती असलेल्यानांच, उमेदवारी देतांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 4:16 am

Web Title: prashant thakur is the richest candidate of bjp zws 70
Next Stories
1 शेकापच्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
2 जिल्ह्य़ात १२ जागांसाठी  ११६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
3 ‘पेड न्यूज’संदर्भात जिल्हा प्रशासन कठोर
Just Now!
X