12 November 2019

News Flash

पुणे : चंद्रकांत पाटील यांची भर पावसात वाहन रॅली

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पावसातही उमेदवारांचा मतदारांच्या जास्तीतजास्त गाठीभेटींवर भर

विधानसभा निडवणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्वच पक्षांचे उमेदवार होईल तेवढा जास्त प्रचार करून सर्वप्रकारे मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पुण्यात आज दुपारी पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाही येथील उमेदवारांकडून भर पावसात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात आला. तर, राज्यभरात चर्चेत असलेल्या कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील भर पावसात वाहन रॅली काढून प्रचार केल्याचे दिसून आले.

यंदाची विधानसभा निवडणूक आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवार ते प्रचारातील मुद्दे यावरून चर्चेत राहिल्याचे दिसून आले. आज सायंकाळी सहा वाजेनंतर निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यानंतर सोमवार २१ ऑक्टोबर रोजी मतदान व २४ ऑक्टोबर रोजी निकालानंतर राज्यात कोणाचे सरकार येणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रत्येक पक्षाकडून यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे पाहायला मिळाले. तर मागील पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रत्येक उमेदवाराकडून प्रचार सभा, दुचाकी रॅली, पदयात्रा आणि कोपरा सभांच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच दरम्यान सभांच्या माध्यमातुन उमेदवारांकडून एकमेकावर आरोपप्रत्यारोपच्या फैरी देखील झाडण्यात आल्या आहेत.

First Published on October 19, 2019 3:27 pm

Web Title: pune candidates continue campaigning even in the rain msr