विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे बापूसाहेब पठारे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काल(दि.१४) सकाळी एका रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्या रॅलीला 12 तास होत नाही, तोवर बापूसाहेब पठारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादीतर्फे वडगाव शेरी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने नगरसेवक सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिल्याने पठारे नाराज असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल(दि.१४) सकाळी  एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवार सुनील टिंगरे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी महापौर आणि प्रभारी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीस 12 तास होत नाही, तोवर पठारे हे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांच्या समवेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश झाला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ncp ex mla bapu pathare joins bjp sas
First published on: 15-10-2019 at 09:14 IST