विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये मेगाभरती झाली आहे. सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणुकीत तिकिट देता यावे यासाठी भाजपाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा अर्थात २० वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदाराला डच्चू देणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात रंगली आहे.

स्थानिक पातळीवरील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलाबा विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात मुंबईत भाजप कोअर कमिटी आणि महाराष्ट्र प्रभारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीला कुलाब्याचे विद्यमान आमदारही उपस्थित होते. मात्र कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर म्हणजे रामराजे निंबाळकर यांचे जावई यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर विद्यमान आमदारांनी विरोध दर्शविला व गोंधळ केल्याचे समजते. महाराष्ट्राचे प्रभारी केशव प्रसाद मोर्या यांना आपल्या बाजुनं वळवण्याचा पुरोहित यांचा प्रयत्न असून त्यामुळे मुख्यमंत्री विरुद्ध राज के पुरोहित असा सामना रंगल्याचे सध्याचे चित्र आहे.

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

आणखी वाचा : छत्रपतींनी छत्रपतींसारखं वागावं; रामराजेंनी उदयनराजे भोसलेंना सुनावले

रामराजे निंबाळकर व त्यांचे जावई राहूल नार्वेकर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि त्यासाठी राज पुरोहितांचा पत्त कट करण्याचे घाटत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपात बाहेरून येणाऱ्यांसाठी नेहमीच पायघड्या घालण्यात येत असून निष्ठावंतांसाठी मात्र फक्त सतरंज्या उचलायचे काम शिल्लक राहिले असल्याची खंत भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे.