जगात फक्त पुरुष गरोदर राहू शकत नाही, तेवढी एकच गोष्ट शक्य नाही, बाकी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आता काही काही जण वाटतात गरोदर असल्यासारखे असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचं नाव न घेता निशाणा साधला. गरोदर पुरुषासारखे काही जण वाटतात  हे वाक्य उच्चारताच नाशिक येथील सभेत एकच हशा पिकला. उपस्थित असलेले लोक ‘टरबूज’, ‘जॅकेट’ अशा घोषणा देऊ लागले. तेव्हा राज ठाकरे म्हणाले मी कुणाबद्दल बोललो ते समजलं ना? असं विचारत राज ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राज ठाकरे यांनी काहीजण आजही गरोदर असल्यासारखे दिसतात असं म्हणताच प्रेक्षकांनीही जल्लोष केला आणि राज ठाकरे यांच्या टीकेला प्रतिसाद दिला. मात्र तुम्ही काय म्हणता आहात ते समजत नाही तुम्हाला कळलं ना तेवढं पुरे आहे असंही राज यांनी म्हटलं आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत झालेला पराभव आपल्या जिव्हारी लागला असंही राज ठाकरे म्हणाले. मात्र नाशिकवरचे माझे प्रेम आजही कमी झालेले नाही. नाशिकमधल्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. पुणे नाशिकमध्ये एकही जागा दिली नाही तरीही भाजपासोबत शिवसेना घरंगळत गेली अशी टीका राज ठाकरे यांनी केली. आपण कुणाच्याही मदतीशिवाय भगवा फडकवायचा आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची नक्कलही केली. तसंच आजही आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेला निवडा असं आवाहन केलं.