News Flash

तुम्हाला रम्या माहितीये का ? भाजपा देणार आता ‘रम्याचे डोस’

जाणून घ्या काय आहेत रम्याचे डोस?

येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात निवडणुका पार पडतील. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडांजगीही पहायला मिळेल. पण अशातच निवडणुकीसाठी एक कॉमन मॅन सज्ज झाला आहे. त्याचं नाव आहे रम्या. पण हा रम्या आघाडी सरकार आणि मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करणार आहे. भाजपा महाराष्ट्राने ‘रम्याचे डोस’ हे अभियान सुरू केले आहे.

निवडणुकांदरम्यान एकमेकांवर हल्लाबोल करण्यासाठी सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत त्यांच्याकडून सोशल मीडियाचा पूरेपूर वापर करून घेतला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये असेल किंवा 2014 मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असतील त्यादरम्यान सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करून घेण्यात आला होता. मतदारांच्या जवळ पोहोचण्याचं उत्तम साधन म्हणून याकडे राजकीय पक्ष पाहू लागले आहेत. त्यातच आता भाजपाकडून निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. ‘कॉमन मॅन’ प्रमाणेच भाजपानं आपलं ‘रम्या’ हे पात्र तयार केलं आहे.

हा रमेश उर्फ रम्या हा भानामती बुद्रुक गावचा रहिवासी असून तो निवडणूक कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य विरोधकांवर हल्लाबोल करणार आहे. विद्यमान सरकारवर आपला जीव आहे. पण गेल्या सरकारवरही आपला जीव होता. त्यांनी आपल्याला 15 वर्ष प्रेमाची दिली. ते प्रेम इतकं अजीर्ण झालं की 2014 मध्ये लोकांनी त्यांना घरीच बसवलं, असही म्हणताना तो दिसतोय. पुढचे काही दिवस त्यांचं हे प्रेम जागवायला हवं. प्रेम व्यक्त करण्याची संधी द्या असं म्हणत प्रेमाचे डोस घेऊन मी येतोय असंही तो म्हणतोय. त्यामुळे भाजापाने आखलेली ही रणनिती काय आहे हे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला रमेश उर्फ रम्या मार्फत स्पष्ट होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 8:47 am

Web Title: ramachye dose bjp maharashtra new campaign for vidhan sabha election 2019 social media jud 87
Next Stories
1 पुणे : UPSC साठी विद्यापीठात विशेष कोर्स, ४० विद्यार्थ्यांची करणार निवड
2 भाजप नेत्यांच्या बडबोलेपणामुळे मोदींच्या राम मंदिराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह – शिवसेना
3 विधान परिषदेच्या आमदारांनाही विधानसभेचे वेध
Just Now!
X