दापोलीत २१०४चे सहा मातब्बर यंदा रिंगणापासून दूर!

दापोली : मागील विधानसभा निवडणुकीतील वलयांकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासह भाजपचे केदार साठे, मनसेचे वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे बंडखोर किशोर देसाई, काँग्रेसचे अँड. सुजित झिमण आणि कुणबी समाजाचे शशिकांत धाडवे हे यंदा दापोलीच्या निवडणूक रिंगणापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम, शिवसेनेचे योगेश कदम यांच्यातच खऱ्या अर्थाने लढली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

मागील निवडणुकीत युती आणि आघाडी न झाल्याने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चारही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले होते. या चारही पक्षाकडून अनुक्रमे सूर्यकांत दळवी, केदार साठे, संजय कदम आणि अ‍ॅड. सुजित झिमण आमनेसामने झाले होते.

त्यातच अपक्ष उमेदवार शशिकांत धाडवे यांनी संघटनात्मक कुणबी समाज  बांधणीच्या जोरावर स्वतची ताकद आजमावली होती. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले दापोलीचे मातब्बर नेते किशोर देसाई यांनीही बंडखोरीचा निर्णय घेतला होता. खेडचे नेते व मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर हेदेखील पहिल्यांदाच रिंगणात ताकदीनिशी उतरले होते. मंडणगडचे नेते ज्ञानदेव खांबे यांनी बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. अशा सक्षम उमेदवारांमुळे मतविभाजनाचा फटका सरतेशेवटी शिवसेनेलाच बसला होता.

शिवसेनेने यंदा सूर्यकांत दळवी यांना उमेदवारी नाकारत योगेश कदम यांना दिली. त्यामुळे शिवसेनेतील दळवी पर्व संपल्याचे संकेत मिळत असून आता ते योगेश कदम यांना रोखण्याचा प्रयत्ंन कसा करणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. मुळात ते एखाद्या पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून िरगणात उतरतील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले होते. पण प्रत्यक्षात तशी भूमिका टाळल्याने त्यांनी स्वतच्या राजकीय कारकिर्दीचा अंदाज स्पष्ट केला आहे. दुसरया बाजूला भाजपचे केदार साठे यांनी मागील निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळवत तब्बल तेरा हजार ८७५ मते मिळवली. त्याचा मोठा फटका अर्थातच शिवसेनेला बसला. यंदा बंडखोरीच्या इराद्याने ते रिंगणात उतरलेही होते. पण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी त्यांनी रिंगणातून माघार घेत शिवसेनेची डोकेदुखी कमी केली आहे. मागील वेळी काँग्रेसकडून अँड. सुजित झिमण यांना उमेदवारी मिळाली होती. कुणबी समाजाचे नेते म्हणून त्यांना लक्षणीय मते मिळणे अपेक्षित होते. पण त्यांना फक्त चार हजार ६९६ मते मिळाली. यंदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसने राष्ट्रवादीला विरोध करण्याच्या दृष्टीने मंडणगडचे काँग्रेसनेते मुश्ताक मिरकर आणि दापोलीचे भाऊ मोहिते यांनी अर्ज भरला होता. त्यांनीही आज आपापले अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचा मतदारसंघावरील दावा संपुष्टात आला आहे. साहजिकच राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

मागील निवडणुकीत आठ ९१२ हजार मते मिळवणारे मनसेचे वैभव खेडेकर हे आता खेडचे नगराध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी मनसेने राष्ट्रवादीचा पािठबा मिळवला होता. स्वाभाविकपणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेडेकर राष्ट्रवादीच्या बरोबर राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्याचप्रमाणे २१०४ मध्ये राष्ट्रवादीचे मातब्बर बंडखोर किशोर देसाई यांना पाच हजार २६१ मते मिळाली होती. निवडणुकीनंतर त्यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबरोबर शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही त्यांनी दळवी यांची साथ सोडलेली नसल्यामुळे त्यांच्यादेखील राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र त्यांना मिळालेली मते यंदा पुन्हा राष्ट्रवादीकडेच वळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. गेल्या वेळी बसपाचे ज्ञानदेव खांबे यांना दोन हजार ७४७ हजार मते मिळाली होती. यंदा त्यांच्याऐवजी प्रवीण र्मचडे यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यांच्या मतांमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मागील निवडणुकीत तिसरया क्रमांकाची १९ हजार ३९ मते मिळविणारया शशिकांत धाडवे यांनी सर्वच राजकीय पक्षांना धोक्याची घंटा दिली होती. यंदा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वानाच राजकीय धक्का दिला होता. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते. पण युती झाल्याने ती शक्यता मावळली. त्यानंतर कुणबी समाजाकडून त्यांना उमेदवारी मिळावी, यासाठीही प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्याऐवजी समाजाने सुवर्णा पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे गतिरगणातील वलयदेखील यंदा संपुष्टात आले आहे. आता त्यांना मिळालेली १९ हजार मते कोणाच्या पारड्यात जाणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. मुळात मागील निवडणुकीत प्रदीप सुर्वे यांच्यासारख्या दळवी विरोधकांनी मदत केल्यानेच १९ हजारांचा आकडा त्यांना गाठता आला होता. पण हेच दळवी विरोधक आता शिवसेनेत योगेश कदम यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे दळवी विरोधक आणि कुणबी समाज संघाच्या सक्षम पािठब्याअभावी सुवर्णा पाटील या कितपत प्रभाव साधणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र त्यांच्या रणनीतीने विभाजित होणारी मते कोणासाठी नुकसानदायी ठरणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.