11 August 2020

News Flash

उदयनराजेंच्या प्रवेशावरून रोहित पवारांचा भाजपाला सल्ला, म्हणाले…

रोहित पवार सोशल मीडियावर सक्रिय

साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांच्या प्रवेशावरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जि.प. सदस्य रोहित पवार यांनीही उदयनराजे यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. “छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो. तसाच आपणही तो मान ठेवावा”, असं सांगत रोहित पवार यांनी भाजपाला सल्ला दिला आहे.

शरद पवार आणि राष्ट्रवादीवर होणाऱ्या आरोपांना उत्तरे देण्यात रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीतील राजकारणाला कंटाळून भाजपात जात असल्याचे उदयनराजे म्हणाले होते. भाजपात दाखल झाल्यानंतर रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. “छत्रपती या उपाधीवर संपुर्ण महाराष्ट्र मनापासून प्रेम करतो. त्या उपाधीमागे असणारा व्यक्ती नाही, तर ती उपाधी मला महत्वाची वाटते. अशा वेळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मोदी साहेबांच्या उपस्थितीत होणार असल्याच सांगण्यात येतं, पण तो कार्यक्रम एका नेत्यांच्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या लॉनमध्ये आयोजित केला जातो. भारतीय जनता पक्षाला मला एकच सांगायच आहे. महाराष्ट्राचे नागरिक म्हणून व्यक्तीहून अधिक त्या उपाधीचा आम्ही मान ठेवला आहे. कोणतही राजकारण न करता मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो की, जसा महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मान ठेवतो. तसाच आपणही तो मान ठेवावा”, असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपाला दिला आहे.

सोलापूर येथे महाजनादेश यात्रेत केंद्रीय गृहंमंत्री आणि भाजपाध्यक्ष राष्ट्रीय अमित शाह यांनी “शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगाव” अशी टीका केली होती. अमित शाह यांच्या टीकेला पवार यांचे नातू रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. रोहित यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून टीका केली होती. “गरज पडली की साहेबांचा सल्ला, गरज पडली की बारामतीत येऊन साहेबांच कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांनीच विचारायचं साहेबांनी काय केलं? डबल ढोल असतो. जो दोन्हीकडून वाजतो. समोरच्या पक्षाचं राजकारण नेहमीच डबल ढोल असल्यासारखं वाजत असत.” असे रोहित पवार म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 6:26 pm

Web Title: rohit pawar give advice to bjp on udayanraje entry bmh 90
Next Stories
1 राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार भडकले
2 गडचिरोली : दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, पाच जखमी
3 पुण्यात रोजगार झाला उणा; इंजिनिअर लावतोय पानाला चुना
Just Now!
X