News Flash

आठवलेंचे निष्ठावंत सोनावणे रिंगणाबाहेर

मुंबईत पक्षाचा एकही उमेदवार नसल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : भाजपने रिपब्लिकन पक्षाला मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर हा मतदारसंघ सोडला, परंतु शिवसेनेने ही जागा अडवून तेथे आपल्या कार्यकर्त्यांला उमेदवारी दिल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निष्ठावंत व मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांना अखेर निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

सोनावणे यांच्यावर अन्याय झाल्याचे मान्य करुन महायुतीची सत्ता आल्यनंतर त्यांना सन्मानपूर्वक सत्तेत सहभागी करुन घेण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. मात्र मुंबईत पक्षाचा एकही उमेदवार नसल्याने रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन आठवले यांनी आपल्या पक्षासाठी सहा जागा सोडून घेतल्या. त्यात मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर, तसेच फलटण, नायगाव, पाथरी, भंडारा व माळशिरस या मतदारसंघांचा समावेश होता. त्यांनी भाजपच्या  चिन्हावर निवडणुका लढण्याचे मान्य केले. आठवले यांना त्यांना देण्यात आलेल्या सहा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले.

मुंबईचे पक्षाचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांची मानखुर्द-शिवाजीनंगर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.  परंतु या मतदारसंघात शिवसेनेचे विठ्ठल लोकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे शेवटच्या क्षणी सोनावणे यांना अपक्ष म्हणून अर्ज दाखल करावा लागला. अपक्ष म्हणून लढण्यास सोनावणे तयार नव्हते व ती बंडखोरी ठरली असती, असे त्यांचे मत होते. त्यामुळे अखेर त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. सोनावणे हे रिपब्लिकन पक्षातील ज्येष्ठ  व आठवले यांचे विश्वासू- निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 3:04 am

Web Title: rpi candidate withdrawal nominations from mankhurd shivaji nagar zws 70
Next Stories
1 Maharashtra assembly election 2019 : राज्यात ३२३९ उमेदवार रिंगणात
2 महायुतीत भाजपविरोधात ‘महा’कुरबुर!
3 Congress-NCP Manifesto : कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता
Just Now!
X