शिवसेना खासदार संजय राऊत यांना वेड लागलं आहे. सत्ता येण्याची वाट पाहतानाच संजय राऊत यांना वेड लागलं आहे असं भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर दानवेंनी निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना लवकरच वेड्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करावं लागेल असंही ते म्हणाले. “संजय राऊत यांनी वारंवार भाजपावर निशाणा साधला मात्र त्यांना वेड लागलं आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की भाजपाच्या नेत्यांना सत्तेसाठी वेड लागलं आहे. मात्र माझं हे म्हणणं आहे की संजय राऊत यांनाच वेड लागलं आहे त्यांना कुठल्यातरी वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. ”

” काय बोलावं आणि काय बोलू नये हे संजय राऊत यांना अजूनही समजत नाही. राजकीय नाट्यामध्ये शिवसेनेला त्यांचा नेताही शोधताही आला नाही. जे कपिल सिब्बल कोर्टामध्ये आज शिवसेनेची बाजू मांडत आहेत त्या कपिल सिब्बल यांनी राम हे काल्पनिक आहेत वास्तव नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कपिल सिब्बल यांच्याबद्दल टीका करणारा लेख संजय राऊत यांनीच लिहिला होता. त्या लेखात कपिल सिब्बल यांचा उल्लेख माकड असा केला होता. आता तेच कपिल सिब्बल यांची मदत शिवसेना घेत आहे ” असाही आरोप दानवे यांनी केला.

“अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल” असंही रावासाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीन पक्ष आमदारांना बसमधून घेऊन फिरत आहेत मात्र महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची चिंता भाजपालाच आहे असंही दानवे यांनी म्हटलं आहे.