News Flash

मेघेंच्या दोन्ही हातात लाडू

दत्ता मेघे भाजप परिवारात आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत एका आमदारकीशिवाय काहीच पदरात पडले नाही.

प्रशांत देशमुख, वर्धा

ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुत्र व शिष्य परत निवडून आल्याने दिवाळीत त्यांच्या दोन्ही हाती लाडू आल्याचा अनुभव ते घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हिंगणा येथून पुत्र समीर मेघे व वर्धेतून डॉ. पंकज भोयर पुन्हा निवडून आले आहेत. या दोघांची शिफोरस गतवेळप्रमाणे मेघेंनीच केली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासाठी राज्यसभेची खासदारकी किंवा राज्यपालपद मिळण्याची जोरदार चर्चा होती. परंतु त्यांना दोन्ही पदांनी हुलकावणी दिली. मात्र त्यांनी पूत्र समीर व शिष्य डॉ. पंकज भोयर यांच्यासाठी पक्षाकडे तिकीट मागितले होते. समीरचे पक्के झाले मात्र भोयर यांना तिकिटासाठी धावपळ करावी लागल्याने मेघेंनीच वजन खर्ची पाडले होते. अखेर दोघांनाही तिकीट मिळून ते आमदार झाले. यावेळी डॉ. भोयर यांना पक्षातून विरोध झाल्यावर मेघेंनीच भोयर यांच्यासह पक्षनेते नितीन गडकरी यांची भेट घेऊन आग्रह धरला. तो मान्यही झाला. यावेळी परत हे दोघे निवडून आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. २०१४च्या निवडणुकीत ज्येष्ठपुत्र सागर मेघे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मेघे परिवाराचा प्रभाव ओसरल्याची चर्चा होती. सलग ४० वर्षांपासून सत्तेत राहणाऱ्या दत्ता मेघे भाजप परिवारात आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत एका आमदारकीशिवाय काहीच पदरात पडले नाही. दत्ता मेघे यांना पद देता न आल्यास समीर मेघे यांना नव्या सरकारात मंत्रीपदाची संधी मिळू शकते, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. नागपूर जिल्हय़ातील भाजपच्या आमदारांवर नजर टाकल्यास ही बाब सहज शक्य होते, असेही हा नेता म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:40 am

Web Title: senior leader datta meghe son re elected zws 70
Next Stories
1 आर्णीत काँग्रेसचा पराभव, मात्र भाजपचाही मतांचा टक्का घसरला
2 यवतमाळ विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मोर्चेबांधणी
3 अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचा लंबक सत्तेकडे
Just Now!
X