X
X

‘बहिणाबाई शब्दामुळे यातना का होतात अन् चक्कर का येते हे ठाऊक नाही’; पवारांचा टोला

READ IN APP

"बहिणाबाई या नावातच आदर आहे"

“बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई म्हटल्याने आक्षेप घेण्यासारखे काय आहे,” असा सवाल राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. परळीमध्ये रंगलेल्या मुंडे भाऊ-बहिणीमधील शाब्दिक वादावर पवार यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला. या प्रकरणात आता शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. “मी चौकशी केली मी पंकजांचे एक स्टेमेंट पाहिले. त्यात बहिणाबाई असा माझा उल्लेख केला. हा शब्द काही योग्य नाही. बहिणाबाई असा उल्लेख करणं योग्य नाही. हे वक्तव्य मला अतिशय यातना देणारं आहे वगैरे असं त्या म्हणाल्याचं मी ऐकलं. मला वाटतं बहिणाबाई या शब्दामध्ये एक आदर आहे. महाराष्ट्रामध्ये बहिणाबाईंच्या कविता आम्ही लहानपणापासून घोकल्या आहेत. बहिणाबाईंनी अनेक विचार त्यांच्या कवितांमधून मांडले. त्याचा स्वीकार महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्राने अगदी आनंदाने केला. त्यामुळे बहिणाबाई या नावातच आदर आहे. त्यामुळे बहिणाबाई या शब्दामुळे यातना का होतात अन् चक्कर का येते हे मला महिती नाही,” असे मत पवारांनी नोंदवले. तसेच प्रचाराच्या शेवटच्या सभेमध्ये पंकजा मुंडेना चक्कर आल्यावरुनही पवारांनी टोला लगावला. ठ३०-४० मिनिटं भाषण करताना काही होत नाही आणि शेवटी चक्कर येते. आता यामागे काय आहे काही कळत नाही. मतदान एक दिवसावर आल्याने आलेली अस्वस्थता किंवा वेगळा निकाल लागण्याची शक्यता आहे की इतर काही मला ठाऊक नाही. मात्र बहिणाबाई या शब्दात काही आक्षेप घेण्यासारखं काही गंभीर आहे असं मला वाटतं नाही,” असं पवार म्हणाले.

“मी धनंजय मुंडेचे एक स्टेमेंट ऐकलं त्यामध्ये ते मोडतोड करुन वापरल्याची तक्रार त्यांनी केली आहे. एक गंमत वाटते राज्य महिला आयोगाने लगेच याची दखल घेत यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. महिला आयोग ही स्वतंत्र आयोगं आहेत. मात्र तिथे आपण भाजपाचे प्रतिनिधी म्हणून बसलोय हे दरवेळी दाखवण्याची गरज नसते,” असा टोला पवरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांना लगावला आहे.

23
X