शिवसेना खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडतानाही पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. संजय राऊत यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आधी त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आणि त्यानंतर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. त्यांचा रुग्णालयातला फोटोही व्हायरल झाला होता. आता आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत हे निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून शिवसेनेची बाजू मांडत आहेत. सातत्याने त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असंच म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक असल्याचं अँजिओग्राफीनंतर समजलं. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

आता आज लीलावती रुग्णालयातून संजय राऊत यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं म्हटलं आहे. संजय राऊत लीलावती रुग्णालयात होते तेव्हा त्यांची भेट उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर शिवसेना नेत्यांनी घेतली होती. तसंच काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेत्यांनीही त्यांची भेट घेतली होती.