सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच खासदार संजय राऊत हे निवडणुकांच्या निकालापासूनच सातत्यानं शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अॅजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही राऊत हे सत्तास्थापनेच्या घडमोडींमध्ये व्यस्त आहेत. अशातच संजय राऊत यांची कन्या त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी दिल्लीतच आहे. राज्यातील सत्तास्थापनेबद्दल तिनंही आपलं मत व्यक्त केलं आहे. बाबांनी ठरवलंय तर मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार, असं मत त्यांची कन्या विधीता राऊत हिनं व्यक्त केलं.

विधीता राऊत (संजय राऊत यांची कन्या)

सध्या संजय राऊत यांचे कुटुंबीय त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे दिल्लीतच आहेत. त्यांची कन्या विधीताही त्यांच्या तब्यतेची काळजी घेत आहे. राज्यातील एकंदरीत परिस्थितीवर तिनंही आपलं मत व्यक्त केलं आहे. “बाबा जे बोलतात ते नेहमी करून दाखवतात. यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही. आम्ही कायम त्यांच्या पाठिशी आहोत. त्यांनी सांगितलंय म्हणजे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, असा विश्वास तिनं व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना तिनं आपलं मत व्यक्त केलं.

आणखी वाचा- शिवसेना-राष्ट्रवादीला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद?, राऊत म्हणतात…

घरात ते सामान्य वडिलांच्या भूमिकेतच असतात. ते खाण्याच्या बाबतीत शिस्तप्रिय आहेत. परंतु त्यांच्या औषधांकडे आम्हाला लक्ष द्यावं लागते. दिल्लीत त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेणारे अनेकजण आहेत, असंही विधीता हिनं म्हटलंय.