27 May 2020

News Flash

‘१०० गुजराती मते मिळवली पण लाखो मराठी मने दुखावली’; ‘केम छो वरली!’वर नेटकरी संतापले

आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर नेटकरी चांगलेच संतापले

'केम छो वरली!'वर नेटकरी संतापले

शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सोमवारी वरळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. अशात आता वरळीतील गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी म्हणजेच अर्थात शिवसेनेने केला आहे. ‘केम छो वरली!’ असा प्रश्न विचारणारे आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाक्यावर झळकले आहे. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारी सेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेने आता गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातीमध्ये पोस्टर लावल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल नेटवर्किंगवर या शिवसेनेच्या गुजराती प्रेमावरुन चांगलीच टीका होताना दिसत असून अनेकांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना ट्रोल केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनेही या पोस्टचा फोटो ट्विट केला आहे.

केम छो वरली या आदित्य ठाकरे यांच्या पोस्टरबाबत सोशल मीडियावर चांगलीच टीका होते आहे.अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरुन शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतला आहे. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले ट्विट…

१)
मराठी माणसाला झालयं काय?

२)
मी भाजपा समर्थक तरी

३)

१०० गुजराती मते मिळवली पण…

४)

मराठी माणसावरील अविश्वास

५)

हारले पाहिजेत

६)

स्वाभिमानाने बोला.. केम छो वरळी

७)

विचार करा

८)

हेच सांगायचा प्रयत्न

९)

चलो अंबरनाथ

१०)

गुजरातमधील वरळी

११)

वरळीचा नवा पत्ता

१२)

तेव्हा गुजराती शिकवली

१३)

मराठी माणसा जागा हो

१४)

मराठी हक्कासाठी…

१५)

वाघ आता ढोकळा खायला लागला

१६)

गुजरातीकरण

दरम्यान, शिवसेनेने केवळ गुजरातीमध्येच नाहीत तर तमीळ, इंग्रजी, मराठी भाषांमध्येही असे पोस्टर वरळीमध्ये लावले आहेत असा युक्तीवाद शिवसेनेचे समर्थक इंटरनेटवर करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 11:54 am

Web Title: shiv sena puts up kem cho worli posters of aditya thackeray in mumbai got troll scsg 91
Next Stories
1 …म्हणून भाजपाला मोठा घास द्यावा लागला : शिवसेना
2 नियम झुगारणाऱ्या वाहन चालकांकडे १८८ कोटी थकित
3 अस्वस्थता आणि नाराजी!
Just Now!
X