News Flash

आघाडीच्या आजच्या बैठकीनंतर चर्चांना पूर्णविराम मिळेल : राऊत

सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत.

संग्रहित

आजच्या आघाडीच्या बैठकीनंतर या बैठकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळेल असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला. अशातच राज्यात अद्यापही सरकार स्थापन करण्यात कोणत्याही पक्षाला यश आलं नाही. त्यातच राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटेल आणि उद्या दुपारपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेचं चित्र स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले.

सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. तसंच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असं राऊत म्हणाले. शिवसेनेची प्रक्रिया ही गतीमान आहे. पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आदेश द्यायचे आणि शिवसैनिक ते पाळायचे. आता शिवसेना पक्षप्रमुख आदेश देतात आणि त्याप्रमाणे पक्षाचं काम होतं. तशीच प्रक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे. त्या ठिकाणी शरद पवार हे आदेश देतात आणि त्यानंतर पुढे काम होतं. काँग्रेसचीही तशीच प्रक्रिया आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असाव्यात, असंही त्यांनी नमूद केलं.

राष्ट्रपती शासनादरम्यान कोणीही सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास ते सरकार स्थापन करू शकतात. ज्या लोकांना वाटतं राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन रहावं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, असे लोक निरनिराळ्या बातम्या पेरत असतात, असंही त्यांनी नमूद केलं. आमच्यामध्ये कोणतेही दोन गट नाहीत. तसंच शिवसेनेत कोणताही संभ्रम नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 10:12 am

Web Title: shiv sena sanjay raut government formation congress ncp support maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 उद्या दुपारपर्यंत सत्तास्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार : संजय राऊत
2 ‘जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे’; राऊतांच्या ट्विटला नवाब मलिकांचं उत्तर
3 शिवसेना-भाजपा सरकारसाठी हिंदुत्ववादी संघटनांचा पुढाकार; संभाजी भिडे मांडणार भूमिका
Just Now!
X