विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी अद्याप शिवसेना-भाजपाने युती जाहीर केली नाही. युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती असली तरी दोन्ही पक्षांमध्ये काही सदस्य नाराज असल्याचं दिसत आहे. शिवसेना आणि भाजपाने अद्याप जागावाटपांची माहिती जाहीर केली नसली तरी वडाळा मतदारसंघ हा भाजपाकडे जाण्याची पूर्ण शक्यता आहे. यामुळे शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जात असल्याने माजी महापौर श्रद्धा जाधव नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी श्रद्धा जाधव यांनी खासदार राहुल शेवाळेंसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली आहे.

Eknath Shinde Raj Thackeray (1)
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
Yavatmal Washim lok sabha election 2024 constituency overview Shinde group benefit or loss of changing candidates at last minute
मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?
Deepak Kesarkar on Thane consistency
ठाण्यात महायुतीतील तिढा संपला? दीपक केसरकरांचं सूचक विधान, म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात…”
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह

वडाळा विधानसभा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यास श्रद्धा जाधव बंडाच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले कालिदास कोळंबकर यांच्याही अडचणीत यामुळे वाढ होण्यची शक्यता आहे. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांचा चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असून आतापर्यंत सात वेळा सलग निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ ते सोडण्याची शक्यता अजिबात नाही. या परिस्थिती आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे.