03 March 2021

News Flash

ही महाराष्ट्राशी गद्दारी; हेगडेंच्या विधानावर संजय राऊत संतापले

विकासनिधी केंद्राला परत पाठवण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचा दावा हेगडेंनी केला आहे

संग्रहीत

भाजपाचे कर्नाटकातील नेते अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी खळबळ उडाली. “केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा निधी परत केंद्राकडे पाठवला,” असं हेगडे म्हणाले होते. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे.

भाजपाचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांचे मुख्यमंत्री का झाले यामागील कारण सांगत खळबळजनक दावा केला आहे. “केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा विकासनिधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले, तर ते या विकासनिधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले,” असा दावा त्यांनी केला.

“तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. त्याचे हे उत्तर आहे, असेही हेगडे यांनी म्हटले आहे.

हेगडे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. “महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे सांगत आहेत. ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 11:27 am

Web Title: shivsena leader sanjay raut angry on bjp mp ananth kumar hegde remarks bmh 90
Next Stories
1 Video : “फडणवीसांच्या नशिबी काय हे सटवीलाच माहित”
2 जबाबदारीची जाणीव करुन देताना खडसेंनी टोचले फडणवीसांचे कान, म्हणाले…
3 कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला ‘ब्रेक’, कंपनीसह प्रवाशांनाही फटका
Just Now!
X