24 November 2020

News Flash

चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी करायला सांगितली, संजय मंडलिक यांचा आरोप

या निवडणूक निकालाबाबत सगळ्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे

चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी करायला सांगितली, शिवसेनेला कमी जागा याव्यात हा त्यांचा यामागचा उद्देश होता असा आरोप शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात युतीची जी पिछेहाट झाली त्याला खासदार संजय मंडलिक जबाबदार आहेत असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला आता संजय मंडलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली. अशात त्यांना इथल्या पराभवाचं खापर जर चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या माझ्यावर फोडायचं असेल तर काय बोलायचं असंही मंडलिक यांनी विचारलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपाची जी पिछेहाट झाली, पराभव झाला त्याला चंद्रकांत पाटील कारणीभूत आहेत कारण बंडखोरी करायला त्यांनीच सांगितलं होतं असा आरोप आता संजय मंडलिक यांनी केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. शिवसेनेला कोल्हापुरात भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या म्हणून चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी यांनी सांगितली असा आरोपही संजय मंडलिक यांनी केला. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील जर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर पक्षातली बंडखोरी त्यांनी का थांबवली नाही? ती होऊ का दिली? याचा विचार केला तर संशय घ्यायला जागा नक्कीच आहे असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे.

निवडणूक निकालाबाबतही संजय मंडलिक यांनी भाष्य केलं. या निवडणूक निकालाबाबत सगळ्याच पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मंडलिक म्हणाले. प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ लक्षात घेऊन मतदारराजा त्याप्रमाणे विचार करतो आहे ही बाब लक्षात घ्यायला हवी. लोकसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते. आता विधानसभेच्या वेळी संदर्भ वेगळे होते असंही मंडलिक यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असंही मंडलिक यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर जिल्ह्यात संजय मंडलिक यांनी सोयीचं राजकारण केलं त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेचा पराभव झाला असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याच आरोपाला संजय मंडलिक यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 3:22 pm

Web Title: shivsena mp sanjay mandlik allegations against chandrkant patil scj 81
Next Stories
1 कोल्हापूर : गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय अखेर रद्द
2 भाजपा, राष्ट्रवादीनंतर या नेत्याचा सेनेत प्रवेश, पंधरवडयात पुर्ण केलं तिहेरी चक्र
3 देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
Just Now!
X