06 December 2019

News Flash

शिवसेनेच्या प्रचारासाठी बाबा रामदेव मैदानात

ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात अचानकपणे शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेले सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी योग गुरु बाबा रामदेव येणार आहेत

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात अचानकपणे शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आलेले सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी योग गुरु बाबा रामदेव येणार आहेत.

सचिन देशमुख यांची उमेदवारी कशी आणि कोठून आली याच्या गुढाची चर्चा लातूर ग्रामीण मतदारसंघात भाजपा व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत होत असतानाच थेट बाबा रामदेवांनी लातूर ग्रामीणचे उमेदवार सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी आपण वेळ देणार असल्याचे जाहीर केले आहे. १५ ऑक्टोबरपासून काही दिवस बाबा रामदेव लातुरात मुक्कामी थांबणार असून या कालावधीत ते सचिन देशमुख यांच्या प्रचारासाठी वेळ देणार आहेत. उद्धव ठाकरे यांची सभाही देशमुखांच्या प्रचारासाठी होणार आहे.

लातूर ग्रामीणची निवडणूक एकतर्फी वाटत होती. अचानकपणे उमेदवारी मिळवून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सचिन देशमुख हे चार दिवस गायब होते. मंगळवारी दसरा महोत्सवानिमित्त मुंबईत ते उपस्थित राहिले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते बुधवारी मतदारसंघात दाखल झाले आहेत. बाबा रामदेव, उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच शिवसेनेचे काही नेतेही दरम्यानच्या काळात लातूर ग्रामीणमध्ये  प्रचारासाठी येणार आहेत.

First Published on October 10, 2019 5:09 am

Web Title: shivsena rally baba ramdev akp 94
Just Now!
X