21 October 2020

News Flash

माझी युती तोडण्याची इच्छा नाही, भाजपाने काय तो निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे

"लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही"

(PTI)

मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपाने काय तो निर्णय घ्यावा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मातोश्रीवर आमदारांची बैठक पार पडली असून उद्धव ठाकरे अद्यापही मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. यामुळे भाजपा आणि शिवसेनेमधील तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनच्या सर्व आमदारांना रंगशारदा येथे मुक्कामी ठेवण्यात येणार आहे. बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पदावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे शिवसैनिक, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असंही ते म्हणाले.

लोकसभेदरम्यान जे ठरलं होतं ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं. जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी आमदार फोडण्यासंबंधी विचारलं असता, कोणी माई का लाल आम्हाला फोडू शकत नाही. ही भाजी मंडई आहे का असं सांगत कोणीही आमचे आमदार फोडू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा- ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच महाराष्ट्रासाठी गोड बातमी!’

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील. आम्ही उद्दव ठाकरे यांना तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाल मान्य असेल असं सांगतिलं आहे. लवकरात लवकर निर्णय कळवण्यात येईल,” अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली आहे.

देवेंद्रजींच्या रुपाने शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार – सुधीर मुनगंटीवार
दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं सांगितलं आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत असून यासंबंधी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, “देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस शिवसैनिक आहेत असं उद्दव ठाकरेंनी म्हटलं होतं, त्यामुळे शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार,” असं म्हटलं. युती व्हावी हीच आमची इच्छा असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार : सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अल्पमतातील सरकार बसवण्याची कोणतीही योजना नसून शिवसेना-भाजपाचं स्थिर सरकार देणार असल्याचं म्हटलं आहे. यासोबत आज सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 2:06 pm

Web Title: shivsena uddhav thackeray mla meeting matoshree bjp devendra fadanvis maharashtra government sgy 87
Next Stories
1 सचिन तेंडुलकरचं दुखणं राज ठाकरेंना
2 अन्यथा राज्यपालांच्या घरावर मोर्चा काढू, आमदार बच्चू कडू यांचा इशारा
3 शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार – सुधीर मुनगंटीवार
Just Now!
X