12 November 2019

News Flash

फक्त सेल्फीसाठी मतदान करू नका; सोनाली कुलकर्णीचं आवाहन

सोनालीने निगडी प्राधिकरण येथे मतदान केले आहे

फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी मतदान करू नका असे आवाहन अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मतदारांना केले आहे. धर्म, जात या विषयावर विचार न करता वैयक्तिक उमेदवारांचे शिक्षण आणि कार्यक्षमता आहे का? त्याचा विचार करा. विचार पूर्वक मत देणे अत्यंत गरजेचं आहे असे सोनाली कुलकर्णी म्हणाली आहे. ती निगडी प्राधिकरण येथे मतदान करण्यासाठी आली होती. तेव्हा तिने मीडियाशी संवाद साधला आहे.

‘सोशल मीडियावर तुम्ही खूप तत्परतेने मतं मांडता. तुम्हाला खूप बोलायचं असतं. पण, जिथं मत मांडायचं असतं तिथं का कमी पडता?’ असा प्रश्न सोनालीने तरुणांना केला आहे. ‘या वेळेला ही टक्केवारी वाढवूयात, पावसाळी वातावरण असलं तरी बाहेर पडून मतदान करा. युवा पिढीने सहभाग घेतला पाहिजे. जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. तुम्हाला पुढील पाच वर्षे कशी हवी आहेत? तुमच्या मना प्रमाणे हवी असतील तर मत मांडण गरजेचं आहे’ असे आवाहन सोनालीने तरुण मतदारांना केले आहे.

आणखी वाचा : “मतदानाच्या दिवशी पाऊस, हा सासऱ्यांचा आशिर्वाद”

दरवेळेप्रमाणे सोनाली निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधन शाळेत मतदान करण्यास पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत तिची आई, वडील आणि भाऊ होते. तिला पाहण्यासाठी मतदारांनी गर्दी केली होती. सोनाली कुलकर्णीचा ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान तिने या चित्रपटाचेदेखील प्रमोशन केले आहे. प्रत्येक सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला हिरकणी चित्रपटाविषयी तिने सांगितले आहे.

First Published on October 21, 2019 1:09 pm

Web Title: sonali kulkarni challenge youngsters to vote avb 95 avb 95