04 March 2021

News Flash

पाठिंबा मिळाल्याचा आव आणला, तरीही असमर्थ ठरले: मुनगंटीवार

भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत यांनी स्पष्ट केलं आहे

काही पक्षांनी पाठिंबा मिळाल्याचा आव आणला तरीही असमर्थ ठरले असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राज्यावर अस्मानी संकट असताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या गोष्टीला काही लोकांचा हट्ट कारणीभूत ठरला आहे असाही टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. योग्य क्षणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु असंही ते म्हणाले. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर झाला असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. भाजपा अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 9:04 pm

Web Title: sudhir mungantiwar criticized shiv sena in press conference scj 81
Next Stories
1 युती तुटली का? या प्रश्नाला उद्धव ठाकरेंची बगल
2 राजकीय विरोधकांबरोबर ‘प्रेमसंबंधां’चा शिवसेनेचा इतिहास
3 राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय घेणार-काँग्रेस
Just Now!
X