News Flash

SC Orders Floor Test in Maharashtra :उद्याच्या उद्या बहुमत घ्या, गुप्त मतदान नको; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश

floor test in maharashtra :सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

“लोकशाही मूल्यांचं रक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आम्ही देत आहोत,” असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.

आणखा वाचा- व्हीप म्हणजे काय?, तो का काढतात?; जाणून घ्या

बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.

आणखा वाचा- बहुमत चाचणी नेमकी काय असते?, ती कशी घेतली जाते?

राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात पुन:विचार याचिका दाखल केली होती. त्यावर रविवारी आणि सोमवारी न्यायलयाने दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आज यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय दिला. न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 10:47 am

Web Title: supreme court orders floor test in the maharashtra assembly to be held on november 27 scsg 91
Next Stories
1 पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील दोन लेन तीन तास बंद राहणार
2 अजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा गटनेता कोण?; विधानसभा सचिव म्हणतात…
3 “अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सिंचन घोटाळ्यातील फाईल बंद होणं म्हणजे…”- एकनाथ खडसे
Just Now!
X