महाराष्ट्रात सगळीकडे दहा रुपयांमध्ये चांगल्या जेवणाची थाळी देणार अशी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी युतीचं सरकार असताना 1 रुपयात झुणका भाकर कशी मिळत होती त्याचं उदाहरणही दिलं. तसंच 10 रुपयात चांगल्या जेवणाची थाळी उपलब्ध करुन देऊ असंही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं. चांगल्या जेवणाची थाळीच नाही तर पहिल्या 300 युनिटचा विजेचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. गावोगावी 1 रुपयात चाचणी करणारी आरोग्य केंद्र उभारणार अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेनेचा जाहीरनामा काय असेल याची झलकच उद्धव ठाकरे यांनी दाखवली.

“रिकामी ताटं वाजवण्याची वेळ आता गेली. चांगल्या जेवणाची थाळी 10 रुपयात उपलब्ध करुन देणार म्हणजे देणार.  हे करावंच लागणार नाहीतर आपण सत्तेत असल्याचा उपयोग काय?” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला एवढंच नाही तर पहिल्या घरगुती विजेच्या वापराचा दर 300 युनिटच्या विजेचा दर 30 टक्क्यांनी कमी करणार अशीही घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

वचननामा यायचा आहे त्यामध्ये ज्या तरतुदी असतील मात्र त्याआधी मला या घोषणा महत्त्वाच्या वाटत आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बस सेवाही शिवसेना उपलब्ध करुन देणार असंही आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं.