पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी साताऱ्यामध्ये प्रचारसभा घेतली. साताऱ्यामध्ये विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले आणि लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या उदयनराजे भोसले यांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी मोदींबरोबरच उदयनराजेंनीही भाषण केले. या भाषणात त्यांनी कलम ३७० रद्द केल्याचा संदर्भ देत उदयनराजेंनी मोदींना लोहपुरुषाची उपमा दिली. मात्र याच उदयनराजेंनी काही वर्षांपुर्वी नोटबंदीनंतरच्या एका मुलाखतीमध्ये ‘कोण मोदी? आमच्याकडे साताऱ्याला मोदी पेढे विकतात’ असे वक्तव्य केले होते अशी आठवण इंटरनेटवर अनेकांना झाली आहे.

आज सैनिक सिमेवर आहेत म्हणून तुम्ही आम्ही सुखाने जगू शकतो असं सांगतानाच उदयनराजेंनी कलम ३७० रद्द करण्यासाठी मोदींचे आभार मानले. राज्याच्या निवडणुकीमध्ये कलम ३७० बद्दल नाही बोलायचे असा आक्षेप घेणाऱ्यांवरही उदयनराजेंनी टीका केली. “कलम ३७० हा केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशातील प्रत्येक राज्याला विचार करायला लावणारा आहे. काँग्रेसने हा निर्णय घेतला असता तर अनेक सैनिकांना बलिदान द्यावं लागलं नसतं. अनेक संसार सुखाने सुरु असते,” असं मत उदयनराजेंनी मांडले. इतकचं नाही तर त्यांनी “हे काम करणारे मोदी हे सरदार वल्लभभाई पटेलांप्रमाणे आर्यन मॅन म्हणजेच लोहपुरुष आहेत,” असं उदयनराजेंनी सांगितले.

thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
map
भूगोलाचा इतिहास: तो प्रवास अद्भूत होता!
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक

मोदी पेढेवाले

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर ‘मला पन्नास दिवस द्या. पन्नास दिवसात सर्व काही पूर्वव्रत होईल,’ असं एका भाषणामध्ये म्हटलं होतं. याचवेळी कराडमध्ये एका कार्यक्रमानंतर त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार असणाऱ्या उदयनराजे यांनी यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजेंनी मोदींवर टीका केली होती. ‘अरे क्या पचास दिन दो. इथे शेतकऱ्यांना खायला अन्न नाही. शेतकऱ्यांची वाट लागलीय. शेतीमाल सडत पडलाय आणि पंतप्रधान म्हणतात पचास दिन रुको. अरे कोण थांबणार आहे. मोठं काही झालं तर जाळपोळ सुरु होईल. थांबवणार कोण हे सगळं? असं झालं तर या सर्वाला मोदी सरकार आणि त्यांचं शासन जबाबदार असेल,’ अशी टीका उदयनराजे यांनी केली होती. पुढे बोलताना त्यांनी मोदींवर टिका करताना, ‘माझे अनेक मित्र भाजपामध्ये आहेत. भाजपाचे अनेक आमदार आणि खासदार मूग गिळून का गप्प आहेत? तुम्ही बोलायला घाबरता कशाला असा सवाल केल्यावर ते म्हणतात अरे वो मोदी असं म्हणतात. अरे मोदी हैं तो क्या? आमच्या इथं साताऱ्याला मोदी पेढेवाले आहेत,’ असा टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांना हसू आवरता आले नाही.

याच व्हि़डिओमध्ये उदयनराजेंनी मोदींवर सडकून टीका केल्याचे दिसते. ‘हा मोदी एवढा मोठा कोण लागून गेला?’ असा सवाल उद्यनराजेंनी उपस्थित करत नोटबंदीनंतरच्या परिस्थितीवर आपला राग व्यक्त केला होता. ‘मला मोदींना एक सांगावसं वाटतं. समाजामुळे तुम्ही आम्ही आहोत. तुमच्यामुळं किंवा एकट्या कुठल्या व्यक्तीमुळे समाज नाहीय हे लक्षात घ्या. माझ्या मते (नोटबंदीचा निर्णय) हा पूर्णपणे मोदींचा मुर्खपणा आहे. या देशात लोकशाही आहे हे त्यांना कळत नाही. या देशात हुकूमशाही चालत नाही. एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो व्यवस्थित चर्चा करुन घेतला पाहिजे,’ असं उद्यनराजे यावेळी म्हणाले होते. काळ्या पैश्यावर कारवाई करण्यासाठी नोटबंदी केल्याचा सरकारच्या दाव्यावरही उदयनराजेंनी टीका केली होती. ‘यांना माहिती नाही काळा पैसा कोणाकडे आहे. यांच्याकडे आयबी आहे, ईडी आहे इतकचं नाही रॉ, सीबीआय आणि आरबीआय सारख्या संस्थाही आहेत तरी भ्रष्टाचारावर कारवाई करण्यात आली नाही. एवढ्या सगळ्या संस्था असताना ज्या फाईल पेंडींग पडून आहेत त्यांच्यावर सरकारने का कारवाई केली नाही? थोडा कर कमी केला असता तर लोकांनी स्वत:हून दंड भरला असता,’ असं मत उदयनराजेंनी नोंदवलं होतं. तसेच मुठभर लोकांनी भ्रष्टाचार केला तर संपूर्ण देशाला मोदी सरकारने नोटबंदी कारुन का वेठीस धरले आहे असा सवालही उद्यनराजेंनी उपस्थित केला होता. ‘या देशाच्या अंतर्गत सुरक्षेला फार मोठ्याप्रमाणात धोका निर्माण झाला आहे. कुठल्याही क्षणी लोकांच्या संतापाचा उद्रेक होऊ शकतो. वणाव पेटल्यानंतर तो कोणी थांबू शकत नाही तशी परिस्थिती निर्माण होईल. देशात जंगलराज येईल. काही मिळालं नाही तर लोकं बँकेत जाऊन बँका लुटतील,’ अशी भितीही उदयनराजे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली होती.

दरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे घडय़ाळ सोडून भाजपाचे कमळ हाती घेणाऱ्या उदयनराजेंची लढत माजी राज्यपाल आणि राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांच्याशी होणार आहे.