|| भक्ती बिसुरे

दुहेरी प्रचाराला सत्यजितची पसंती!:- निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं खरं श्रेय प्रचाराचं नियोजन करणाऱ्याला जातं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. शिवाजीनगर विधासनभा मतदार संघातून काँग्रेसचे दत्ता बहिरट विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ शिरोळे अशी लढत होत आहे. सिद्धार्थ शिरोळे पुणे महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. शहराचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचा पुत्र ही देखील त्यांची ओळख आहेच. सिद्धार्थ यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांचा मावस भाऊ सत्यजित थोरात याने घेतली आहे.

अमेरिकेत इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करून काही काळ उद्योजक म्हणून काम केल्यानंतर सत्यजित सध्या पुण्यात हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांच्या प्रचारापासून सत्यजितने निवडणूक प्रचाराचं तंत्र आत्मसात करून त्याचा वापर करायला सुरुवात केली. त्यातले बारकावे लक्षात घेऊन, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स, स्मार्टफोन्स यांचा अधिकाधिक वापर करत स्मार्ट प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचणं हे सत्यजितच्या कामाचं वैशिष्टय़ आहे.

सत्यजित सांगतो, सिद्धार्थचे वडील, आई, पत्नी, भाऊ असे सगळेच प्रचारात सक्रिय आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणं, सिद्धार्थने नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची माहिती देणं असा पारंपरिक प्रचार ते करतात. त्याच्या बरोबरीने पदयात्रा, बैठका, एसएमएस कॅम्पेन, सायकल रॅली अशा अनेक गोष्टींचं नियोजन मी करत आहे.

समाज माध्यमांवरचा स्मार्ट प्रचार हे माझ्या प्रचार नियोजनाचं वैशिष्टय़ आहेच, मात्र पारंपरिक पद्धतीने ध्वनिवर्धक लावलेल्या रिक्षा, एलईडी व्हॅन्स यांचा वापर देखील प्रचारासाठी करत आहे.

हॉटेल व्यवसाय आणि फिटनेस ही माझी वैयक्तिक आवड आहे. निवडणुका आणि राजकारण यात स्वत सहभागी होण्यात सद्य:स्थितीत मी इच्छुक नाही, मात्र प्रचाराचं नियोजन करण्याची आवड आहे आणि ते मी जीव ओतून करत आहे, असंही सत्यजित म्हणाला. भक्ती बिसुरे

निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं खरं श्रेय प्रचाराचं नियोजन करणाऱ्याला जातं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. शिवाजीनगर विधासनभा मतदार संघातून काँग्रेसचे दत्ता बहिरट विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे सिद्धार्थ शिरोळे अशी लढत होत आहे. सिद्धार्थ शिरोळे पुणे महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत. शहराचे माजी खासदार अनिल शिरोळे यांचा पुत्र ही देखील त्यांची ओळख आहेच. सिद्धार्थ यांच्या निवडणूक प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांचा मावस भाऊ सत्यजित थोरात याने घेतली आहे.

अमेरिकेत इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स करून काही काळ उद्योजक म्हणून काम केल्यानंतर सत्यजित सध्या पुण्यात हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत अनिल शिरोळे यांच्या प्रचारापासून सत्यजितने निवडणूक प्रचाराचं तंत्र आत्मसात करून त्याचा वापर करायला सुरुवात केली. त्यातले बारकावे लक्षात घेऊन, मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स, स्मार्टफोन्स यांचा अधिकाधिक वापर करत स्मार्ट प्रचार करून मतदारांपर्यंत पोहोचणं हे सत्यजितच्या कामाचं वैशिष्टय़ आहे.

सत्यजित सांगतो, सिद्धार्थचे वडील, आई, पत्नी, भाऊ असे सगळेच प्रचारात सक्रिय आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणं, सिद्धार्थने नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची माहिती देणं असा पारंपरिक प्रचार ते करतात. त्याच्या बरोबरीने पदयात्रा, बैठका, एसएमएस कॅम्पेन, सायकल रॅली अशा अनेक गोष्टींचं नियोजन मी करत आहे.

समाज माध्यमांवरचा स्मार्ट प्रचार हे माझ्या प्रचार नियोजनाचं वैशिष्टय़ आहेच, मात्र पारंपरिक पद्धतीने ध्वनिवर्धक लावलेल्या रिक्षा, एलईडी व्हॅन्स यांचा वापर देखील प्रचारासाठी करत आहे.

हॉटेल व्यवसाय आणि फिटनेस ही माझी वैयक्तिक आवड आहे. निवडणुका आणि राजकारण यात स्वत सहभागी होण्यात सद्य:स्थितीत मी इच्छुक नाही, मात्र प्रचाराचं नियोजन करण्याची आवड आहे आणि ते मी जीव ओतून करत आहे, असंही सत्यजित म्हणाला.