शेतकऱ्यांनी अजिबात घाबरु नये, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ” शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे ” अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी उद्धव ठाकरेंनी केली. त्यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेंनी दिलासा दिला.

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रवर ओल्या दुष्काळाचं सावट आहे. उन्हाळ्यातील दुष्काळ, त्यानंतर महापूर आणि पूर असल्यानंतर अतिवृष्टीनं नुकसान केलं आहे. मी एका भागात आलो आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागात काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे शिवसेनेने दिलेले वचन आहे. शिवसेना वचनपुर्ती करणार याची खात्री बाळगा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं, शेतकऱ्यांना भेटून त्यांची दुःखं जाणून घेतली. पाहणी दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने विटा येथे उभारण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट दिली. तसंच शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. शरद पवार हे आज विदर्भ दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.