शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार असा दावा पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा हा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला मानला जात होता. मात्र गेल्या तीन दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत  यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेता निवडीची प्रक्रिया आज पार पडणार आहे. त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचाही देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. यासंदर्भात संजय राऊत यांना विचारलं असता मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि तो नेता म्हणजे उद्धव ठाकरेच असतील. पुढील पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.