|| प्रशांत देशमुख

जिल्हय़ात लढवलेल्या तीनही जागा जिंकून भाजपने शंभर टक्के यश प्राप्त केले असून देवळीत सेना उमेदवाराविरोधात विजय मिळवून काँग्रेसने कशीबशी लाज राखली. जिल्हय़ात वर्धेत डॉ. पंकज भोयर, हिंगणघाटला समीर कुणावार व आर्वीत दादाराव केचे हे भाजपचे तीनही उमेदवार चांगल्या मतांनी विजयी झाले. तर देवळीत सेना उमेदवाराऐवजी भाजप बंडखोराशी लढत देत काँग्रेसचे रणजीत कांबळे पाचव्यांदा विजयी झाले. आर्वीत भाजपचे केचे यांना ८७,३१८ तर काँग्रेसचे अमर काळे यांना ७४,८५१ मते पडली. हिंगणघाटला समीर कुणावार यांनी दणदणीत यश खेचले. समीर कुणावार यांना एक लाख ३,४२४ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू तिमांडेंना ५२,९९४ मते पडली.

देवळीत काँग्रेसचे रणजीत कांबळे यांना ७५,३४५, भाजप बंडखोर राजेश बकाणे यांना ३९,५४१ तर सेनेचे समीर देशमुख यांना ३०,९७८ मते पडली. वध्रेत काँग्रेसचे डॉ. पंकज भोयर यांनी आठ हजारावर मतांनी विजय प्राप्त केला. त्यांना ७९,१५६ तर काँग्रेसच्या शेखर शेंडे यांना ७१,३०९ मते प्राप्त झाली.