|| प्रदीप नणंदकर

इतिहासात पहिल्यांदाच नोटावर सर्वाधिकनवख्या चेहऱ्याला लॉटरी : – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच नवख्या चेहऱ्याला आमदारकीची लॉटरी लागली. जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी पार पाडणारे कैलास पाटील यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर उमेदवार संजय निंबाळकर यांचा १३ हजार ४६७ इतक्या मतांनी पराभव केला.  विजयी कैलास पाटील यांना ८७ हजार ४८८ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निंबाळकर यांना ७४ हजार २१ मते मिळाली. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अजित पिंगळे यांनीही विधानसभेसाठी आपले नशीब आजमावले. पिंगळे यांनी २० हजार ५७० मते मिळवली आहेत. त्यामुळे सेनेच्या मतांमध्ये विभागणी झाली होती.   २६ हजार ८९९ मतदान होण्याचा विक्रम यावेळच्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघात नोंदला गेला.

लातूर ग्रामीण मतदारसंघ हा महायुतीत भाजपाकडे होता. उमेदवारी घोषित करण्याच्या दिवशी हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला व भाजपचे रमेश कराड यांच्यावर पक्षाने मोठा अन्याय केला. शिवसेनेने ज्यांनी कधी पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही, शिवसेनेचे कसलेही काम केले नाही, ज्याचा मतदारसंघाशी संबंध नाही अशा सचिन देशमुख यांना उमेदवारी देऊ केली. भाजपाचे रमेश कराड यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पक्षादेश मानून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मात्र,  शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांनी मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभही केला नाही, मोठी सभा तर सोडा साधी कोपरा सभाही घेतली नाही. निवडणूक प्रचाराच्या काळात अखेरच्या दिवशी एका वर्तमानपत्राला जाहिरात देण्यासाठीची परवानगी त्यांनी मागितली या व्यतिरिक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्रचारासाठी कोणताही परवाना मागितला नाही.

भाजपाचे कार्यकत्रे यावर प्रचंड अस्वस्थ होते. हा मतदारसंघ पूर्वीचा गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ. वर्षांनुवष्रे मतदारांना कमळाच्या चिन्हावर मतदान करण्याची सवय होती. यावेळी पहिल्यांदाच मतपत्रिकेवर कमळ चिन्ह नव्हते. नगरपंचायतीपासून सर्व प्रकारच्या निवडणुकीत भाजपाची या मतदासंघावर पकड आहे. याउलट शिवसेनेच्या हाती साधी ग्रामपंचायतदेखील नाही. तरीदेखील हा मतदारसंघ शिवसेनेला का सोडण्यात आला, याचे उत्तर एकाही भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत नोटाचा वापर करण्याचे ठरवले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर जे तंबू टाकण्यात आले होते त्यात काँग्रेस पक्षाचा एक तंबू व दुसरा ‘नोटा’चे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा होता. लोकांना ‘नोटा’वर मतदान करण्याची कधीच वेळ आली नव्हती. त्यामुळे मतदारयादीतील शेवटचा क्रमांक नोटाचा आहे, त्यावरील बटन दाबा असे लोकांना समजावून सांगितले जात होते. त्यातूनच २६ हजारांपेक्षा अधिक जणांनी आपले मत नोंदवले. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. वास्तविक रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांने नोटाला मतदान न करण्याचे आवाहन केले होते, तरीही वरिष्ठांचे लक्ष वेधण्यासाठीच हे पाऊल कार्यकर्त्यांनी उचलले. कार्यकर्त्यांच्या भावनांची आता तरी भाजपाचे वरिष्ठ दखल घेतील, ही त्यांची माफक अपेक्षा आहे.