20 January 2020

News Flash

पन्नास वर्षे सत्ता असताना कु कडीचे पाणी का दिले नाही – पंकजा मुंडे

 बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संपवले, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरू झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विरोधक कु कडीच्या पाण्याचा मुद्दा घेऊ न राजकारण करत आहेत. मग गेल्या पन्नास वर्षांत तुमच्याकडे सत्ता व जलसंपदामंत्री पद असूनही  पाणी का  दिले नाही आणि आता काय पाणी देणार, असा सवाल ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी अजित पवार यांनाल उद्देशून  केला.

महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. १७ रोजी सायंकाळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जामखेड शहरातील बाजारतळ या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केली होती.

या वेळी खासदार डॉ. सुजय विखे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना उपनेते रमेश खाडे, उमेदवार प्रा. राम शिंदे, जि.प. सदस्य सोमनाथ पाचरणे, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, परिषद सभापती गौतम उतेकर, सुभाष आव्हाड सर, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊ त उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संपवले, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला गळती सुरू झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जलसंपदा मंत्री खाते होते तेंव्हा कुकडीचे पाणी का दिले नाही असा सवाल त्यांनी केला.

आघाडी सरकारच्या काळात ४ लाख बचत गट होते, तेच खाते माझ्याकडे आल्यानंतर ४४ लाख बचतगट तयार केले आहेत. त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध केले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on October 19, 2019 4:11 am

Web Title: vidhan sabha election ncp congress akp 94 2
Next Stories
1 भाजपचे नेते झोपेतही माझेच नाव चाळवतात
2 पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा करण्याचे राजकारण बंद करा – केजरीवाल
3 बुलढाणा जिल्हय़ातील तुल्यबळ लढतीत जातीय समीकरणे महत्त्वाची
Just Now!
X