29 May 2020

News Flash

मतदान उत्साहात

ढगाळ हवामान, पावसाचा अंदाज याचा मतदानावर परिणाम होण्याची धास्ती सोमवारी मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडलेल्या मतदारांनी फोल ठरवली

(संग्रहित छायाचित्र)

पावसाचे सावट ओसरल्यानंतर

ढगाळ हवामान, पावसाचा अंदाज याचा मतदानावर परिणाम होण्याची धास्ती सोमवारी मतदानासाठी उत्साहात घराबाहेर पडलेल्या मतदारांनी फोल ठरवली. सकाळी संथपणे सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी पावसाचे सावट ओसरल्यानंतर वेगात सुरू झाली. सायंकाळी अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. नवमतदारांपासून मध्यमवयीन, अगदी ज्येष्ठांपर्यंत उत्साह होता. शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदानाचा अधिक जोर होता. सकाळी पहिल्या दोन तासांत १५ मतदारसंघांत केवळ ५.५० टक्के मतदान झाले होते. नंतरच्या म्हणजे नऊ ते ११ या कालावधीत टक्केवारी १४.९२ वर गेली. पुढील चार तासात म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत यामध्ये जवळपास तिपटीने वाढ होऊन ते ४२.६९ टक्क्यांवर पोहोचले.

जिल्ह्य़ातील १५ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी सात वाजता कडेकोट बंदोबस्तात चार हजार ५७९ केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. रिंगणात एकूण १४८ उमेदवार आहेत. यामध्ये नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक १९, तर दिंडोरीत सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार आहेत. आदल्या दिवशी म्हणजे रविवारी अनेक भागात ढगाळ हवामान होते. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला होता.  शनिवारी शहर परिसरात रिपरिप झाली होती. मतदानाच्या दिवशी सकाळी आकाशात ढग असल्याने पाऊस पडून त्याचा मतदानावर परिणाम होईल की काय, अशी उमेदवारांना धास्ती होती. परंतु, तसे घडले नाही. सकाळी पावसाची चिन्हे होती. यामुळे मतदानास संथपणे सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत जेमतेम पाच टक्के मतदान झाले. कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालय, गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरुजी शाळा, रचना विद्यालय, नाशिकरोड परिसर, सिडकोतील अनेक केंद्रांवर सकाळी संथपणे मतदान सुरू झाले. घडय़ाळाचे काटे जसे पुढे सरकले, तसे मतदार घराबाहेर पडू लागले. काही केंद्रांसमोर चिखल साचलेला होता. व्ही. एन. नाईक महाविद्यालयासमोरील रस्ताच चिखलमय झाला होता. सिडकोतील एका केंद्रासमोर पाणी साचले होते. परंतु, त्याची तमा न बाळगता मतदान सुरू होते. रांगा असणाऱ्या केंद्रांवर ज्येष्ठांना प्रथम प्राधान्य देण्यात आले.

दुपापर्यंत झालेल्या मतदानात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडल्याचे आकडीवारीवरून स्पष्ट झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील नाशिक मध्य २९.७७, नाशिक पूर्वमध्ये ३२.७८ आणि नाशिक पश्चिममध्ये ३६.४२ टक्के मतदान झाले होते. शहर आणि ग्रामीणचा काही भाग समाविष्ट करणाऱ्या देवळाली मतदारसंघात ३८.१७, इगतपुरीत ४६.७०, नांदगावमध्ये ३५.३८, मालेगाव मध्य ४६.३०, मालेगाव बाह्य़ ४२.७०, बागलाण ४३.५६, कळवण ५६.६०, चांदवड ४७.१७, सिन्नर ४६.९९. निफाड ४७.३५, दिंडोरी ५४.१४ असे मतदान झाले. दुपारी चारनंतर अनेक केंद्रांवर पुन्हा मतदारांची रिघ लागली.

मतदारांनी मतदान करावे, याकरिता वेगवेगळ्या आस्थापना, हॉटेल्स आदींनी नागरिकांसाठी सवलती वा बक्षिसाच्या योजना सादर केल्या होत्या. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने विशेष उपक्रम राबविले. या सर्वाची परिणती मतदानाची टक्केवारी उंचावण्यात होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. मतदार यादीतील घोळ कमी झाल्याचे प्रकर्षांने दिसले. काहींची नांवे मतदार यादीत सापडली. पण छायाचित्र, वयात तफावत असल्याने आणि आवश्यक तो पुरावा सादर करू न शकल्याने त्यांना मतदान करता आले नाही. जिल्ह्य़ात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दोन्ही मतदारसंघातील ६० संवेदनशील मतदार केंद्रांवर जादा बंदोबस्त तैनात करत तेथील घडामोडींचे वेब कास्टिंग करण्यात आले. निवडणूक कामासाठी वापरलेल्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असल्याने सर्व घडामोडींवर प्रशासनाची नजर होती.

बिघाडामुळे  ९० यंत्रे बदलली मतदानासाठी सकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सुरुवातीला काही केंद्रांवर यंत्रांतील बिघाडाचा फटका सहन करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:33 am

Web Title: vidhan sabha election voter election processing akp 94
Next Stories
1 ‘वॉर रूम’मधून ४५० मतदान केंद्रांवर नजर
2 मतदार यादीत नाव शोधण्याचा गोंधळ कायम
3 लोकशाहीला बळकट करणारे पाय, हात नसूनही शेतकऱ्याचं मतदान
Just Now!
X