तुल्यबळ लढतींअभावी मतदारांमध्ये चर्चेला ओहोटी

अवसान गळलेला विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसमोर मतदार येत नसल्याने  नवी मुंबई बहुतांशी मतदार संघाच्या प्रचारातील उत्साह मावळला असल्याचे दृश्य आहे. नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघातील भाजपचे उमेदवार पक्षाने दिलेला कार्यक्रम राबवित आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आपल्याला जमेल तसा प्रचार करीत आहे. यात कार्यकर्त्यांशिवाय जनतेचा फारसा उत्साह दिसून येत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक असल्यासारखे वाटत नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांत उमटत आहे.

राज्याच्या विधानसभेसाठी सहा दिवसांनी एकाच दिवशी सर्वत्र मतदान होणार आहे. शनिवारी संध्याकाळी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या चार दिवसात वाहनाद्वारे रोड शो करण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.

नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघात चुरशीच्या लढती नाहीत. सत्ताधारी शिवसेना भाजजा महायुतीच्या उमेदवारांनी पक्षाने नेमून दिलेला प्रचार पूर्ण केला आहे. ऐरोलीतील महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांचा प्रचार ८० टक्के संपलेला आहे तर बेलापूरातील म्हात्रे यांचाही प्रचार अंतीम टप्यात आहे. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विजय माने यांनी शेवटच्या दिवसात उमेदवारी मागे घेतल्याने म्हात्रे यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत हा अर्ज मागे न घेतल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे.

त्यामुळे काही हजार मते त्यांचा पारडयात पडण्याची भिती महायुतीच्या उमेदवाराल आहे. म्हात्रे गेल्या निवडणुकीत केवळ एक हजार ४०० मतांनी निवडून आलेल्या आहेत.

त्यामुळे त्यांच्या दृष्टीने माने यांना काही शे पडणारी मते देखील महत्वाची आहेत. हा अर्ज त्यांनी मुदतीत मागे घेण्याची गरज होती असे म्हात्रे गोटात सांगितले जात आहे. यापूर्वीच्या निवडणूकीत युती नसल्याने चुरस निर्माण झाली होती. तिरंगी लढतीत नाईक यांच्यासारख्या वजनदार नेत्याला पराभव पत्करावा लागला होता तर ऐरोलीत शिवसेनेच्या

विजय चौगुले यांनी संदीप नाईक यांना आव्हाण निर्माण केले होते. आता हे एकमेकांचेप्रतिस्पर्धी

हातात हात घालून एकाच उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. दोन्ही मतदार संघातील चुरस ह्य़ा एकांगी वाटू लागल्याने निवडणूकीत उत्साह नसल्याची प्रतिक्रिया मतदार व्यक्त करीत आहेत.

मतदानावर परिणाम

मतदार संघ पुर्नरचनेनंतर तयार झालेल्या नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघात यापूर्वी ६० टक्क्य़ांहून अधिक मतदान झालेले नाही. त्यामुळे निवडून आलेला उमेदवारांची मताधिक्य जास्त नाही. या निवडणूकीतील ओसरलेला उत्साह पाहता कमी मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.