28 May 2020

News Flash

मतदारांना पावसाऐवजी उकाडय़ाची धास्ती

राज्यात परतीच्या पावसाने अनेक प्रचार फेरींवर पाणी फेरले होते.

द्विधा मन:स्थितीत मतदान; टक्केवारीवर परिणाम

मतदानाच्या दोन दिवस अगोदर परतीच्या पावसाने लावलेली संततधार हवामान खात्याच्या अंदाजानुसार मतदानाच्या दिवशीही सुरू राहिल्यास मतदाना दिवशी बाहेर पडावे की नाही अशी द्विधा मन:स्थितीत मतदारांची मतदानाच्या आदल्या दिवशी होती. मात्र मतदानाच्या दिवशी पडलेल्या कडाक्याचे उन्ह पाहता पुन्हा त्याच स्थितीत मतदार अडकल्याने त्याचा परिणाम मतदानावर जाणवला.

राज्यात परतीच्या पावसाने अनेक प्रचार फेरींवर पाणी फेरले होते. अनेक उमेदवारांना संध्याकाळच्या प्रचार फेरी अर्धवट सोडून माघारी परतावे लागले होते. शनिवारी संध्याकाळी प्रचाराची मुदत संपल्यानंतर अनेक उमेदवारांनी भेटीगाठींवर भर दिला पण त्या वेळीही संततधार पडणाऱ्या पावसाने उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत होते. त्यात हवामान विभागाने परतीचा पाऊस दिवाळीपर्यंत मुक्कामाला राहणार असल्याचा अंदाज जाहीर केल्यानंतर उमेदवारांच्या छातीत धस्स झाले.

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदारसंघांत अनुक्रमे मागील निवडणुकीत ५१ व ४९ टक्के मतदान झालेले आहे. त्या वेळी पावसाचा मोसम संपला असताना नवी मुंबईत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होऊ शकले नाही. सोमवारी सकाळपासून पावसाऐवजी कडाक्याचे ऊन पडले होते. ऊन पडल्याने जादा मतदान होईल, अशी आशा उमेदवारांना वाटू लागली असतानाच कडाक्याच्या उन्हामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी संध्याकाळी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर हीटमुळे काही मतदारांना घामाच्या धारा लागल्या होत्या. उन्हाची दाहकता संध्याकाळी चार वाजेपर्यंत कायम होती. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे अनेक मतदारांना त्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनेक मतदार मतदानाला जाऊ की नको अशा द्विधा मन:स्थितीत अडकले होते.

मतदानासाठी दुकाने बंद

मतदानासाठी मॉल्स, हॉटेल्स, काही दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर काही बडय़ा दुकानांनी ती तीननंतर खुली केली. कर्मचाऱ्यांनी मतदान करावे यासाठी ह्य़ा सुविधा देण्यात आल्या होत्या पण त्याचा फायदा मतदारांनी घेतल्याचे दिसून येत नाही. तीन दिवस लागून आलेल्या सुट्टीचा आनंद मतदारांनी घेतल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्वसाधारणपणे सकाळी नऊनंतर महिला आणि ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडतात पण दहानंतर पडलेले कडाक्याचे ऊन अंगाची काहिली करीत होते. त्यामुळे अनेक मतदारांनी दुपारनंतर मतदान करण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतरही मतदान वाढू शकले नाही. – नरेश गायकर,  मतदार, कोपरखैरणे

 

(तृतीयपंथीयांचा मतदानाचा हक्क)

विधानसभा निवडणुकीत तृतीयपंथीयांना तृतीयपंथी म्हणून मतदान करण्याची संधी असून ऐरोली आणि बेलापूर मतदार संघात तृतीयपंथीयांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी तृतीयपंथीयांनी महागाई कमी करावी, जादा वीजबिल आकारणी तसेच तृतीयपंथीयांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. निवडणुकांसाठी तयार केलेल्या नवी मुंबई मतदार यादीत एकून  ३६  तृतीयपंथी मतदारांची नोंद केली आहे. ३२ मतदार हे ऐरोली विधानसभा क्षेत्रात  ३२ तर बेलापूर मतदार संघात ४ तृतीय पंथीय मतदार आहेत.

२८ वर्षांपासून मी मतदान करीत आहे. येणाऱ्या उमेदवाराने आमच्या समस्या देखील मार्गी लावाव्यात. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे,ती नियंत्रणात आणून सामान्य नागरिकांच्या आवाक्यात राहील असे नियोजन करावे. तसेच आम्हा तृतीयपंथीयांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात, असे महेश जुली पुजारी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 1:43 am

Web Title: voters austerity rain akp 94
Next Stories
1 मतदारसंघ आणि पक्ष बदलल्यावर तरी नाईक यांना आमदारकी मिळणार का?
2 प्रचाराची आज सांगता
3 नवी मुंबईच्या प्रेमापोटी भाजपमध्ये प्रवेश
Just Now!
X