आमच्यातील मतभेद दूर झाल्यास मिळून सरकार स्थापन करु, अशी इच्छा काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत राज्यपालांकडे राजीनामा सोपवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भुमिका मांडली.

फडणवीस म्हणाले, “आम्ही महायुतीसाठी अद्यापही तयार आहेत. त्यामुळे युती तुटली आहे असं मी म्हणणार नाही. आमची खंत मात्र दूर व्हायला हवी त्यानंतर शिवसेनेशी चर्चा होईल. आम्ही आजूनही चर्चेसाठी तयार आहोत, त्यामुळे आमच्यातील मतभेद दूर झाल्यास मिळून सरकार स्थापन करु.”

उद्धव ठाकरेंची पहिलीच पत्रकार परिषद धक्कादायक होती. निकालानंतर पहिल्याच दिवशी सर्व पर्याय खुले आहेत असं म्हणणं योग्य नव्हतं. आमच्यासोबत चर्चेऐवजी त्यांची विरोधकांसोबत चर्चा सुरु होती. त्याचबरोबर भाजपासोबत चर्चा करायची नाही असं म्हणणंही ठीक नव्हतं उलट गैरसज चर्चेतून सुटणं योग्य झालं असतं. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने केलेली टीकाही आपल्या जिव्हारी लागल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

भाजपाकडून आपले आमदार फोडण्याची भीती शिवसेनेला असल्याने त्यांनी आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. यावर पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, भाजपा कोणतंही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.