13 December 2019

News Flash

युती तुटली का? या प्रश्नाला उद्धव ठाकरेंची बगल

हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत युती तुटली का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी बगल दिली आहे. भाजपा अजूनही संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की रोज नवनवे प्रस्ताव येत असतील तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं, मला खोटं ठरवण्यात आलं त्यामुळे माझा संताप झाला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाने परवा आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मित्राचा सल्ला आम्ही ऐकला आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.  जे काही ठरेल ते जगजाहीर होणार आहे आम्ही लपूनछपून

महाराष्ट्राचं सरकार चालवणं हा काही पोरखेळ नाही. संख्याबळ आणि पाठिंब्याची पत्रं आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी आम्हाला मुदत दिली नाही. राष्ट्रपती राजवट लागल्याने आम्हाला सहा महिन्यांचा कालवाधी दिला आहे. एवढे दयावान राज्यपाल आम्हाला लाभलेच नव्हतेच. वेगळ्या विचारधारेचे प्रश्न एकत्र कसे येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. भाजपा आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा कसे एकत्र कसे आले? चंद्राबाबू आणि भाजपा एकत्र कसे आले होते? याची माहिती मागितली आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाजपाने आमच्यासोबत ठरवलेल्या गोष्टी होत्या त्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलंच होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाची आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे. अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मला अभिमान वाटतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे ४८ तासांची मुदत मागितली. आम्ही सरकार बनवू इच्छितो हा दावा आम्ही केला. मात्र आम्हाला ४८ तासांची मुदत दिली नाही. मात्र राज्यपाल खूप दयावान आहेत त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. गेल्या अनेक वर्षांत एवढी दयावान व्यक्ती आपल्या राज्याला लाभली नव्हती असाहीट टोला त्यांनी लगावला.

 

First Published on November 12, 2019 8:19 pm

Web Title: what about alliance uddhav thackeray says nothing about it scj 81
Just Now!
X