सध्या महाराष्ट्रात हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. महाशिवआघाडीचं सगळं ठरलेलं असतानाच शनिवारी महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर शरद पवार यांनी हा निर्णय अजित पवारांचा एकट्याचा असल्याचं सांगितलं. आमदारांची फाटाफूट, पळवापळवी टाळण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी काळजी घेतली. आता बहुमत चाचणीच्या वेळी काय होणार हा प्रश्न आहे. यातली एक शक्यता आहे ती म्हणजे बहुमत चाचणीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गैरहजर राहिले तर?
बहुमत चाचणीच्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार गैरहजर राहिले तर?
फडणवीस आणि पवार यांचं सरकार स्थापन झालं आहे त्यामुळे बहुमताच्या चाचणीशिवाय हे सरकार बरखास्त होऊ शकणार नाही
भाजपाने १०५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने ५६, राष्ट्रवादीने ५४ तर काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या आहेत. तर असे २९ आमदार आहेत जे अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षांचे आहेत.
अशात २८८ पैकी जर राष्ट्रवादीचे ५४ आमदार गैरहजर राहिले तर आमदारांची संख्या २३४ वर येईल. असं घडलं तर बहुमत सिद्ध करण्याचा आकडा ११८ वर येईल. असं झाल्यास भाजपाला बहुमत सिद्ध करणं अगदीच सहज शक्य होईल.
असं झाल्यास महाराष्ट्रात अल्पमतातलं सरकार येईल यात काही शंका नाही. मात्र याआधीही महाराष्ट्रात असे प्रयोग झाले आहेत.
२०१४ मध्ये काय झालं?
भाजपाने २०१४ मध्येही सरकार स्थापन केलं होतं
आवाजी मतदान घेऊन बहुमत सिद्ध केलं
शिवसेनेवर विरोधात बसण्याची वेळ आली होती, नंतर शिवसेना सत्तेत सहभागी झाली
आता शनिवारी जे महाराष्ट्रात घडलं ते महाराष्ट्रासाठी अनाकलनीय होतं. राजकीय भूकंप झाला या भूकंपामुळे सगळेच हादरले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर टीका केली. त्यानंतर आता काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 3:14 pm