News Flash

धक्कादायक! : “घडाळ्याचं बटण दाबलं तरीही मत कमळालाच”

निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचं त्यांनीही मान्य केलं. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आलं.

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर घडाळ्यासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातल्या खटाव तालुक्यातील मतदान केंद्र क्रमांक २५० नवलेवाडी  येथे हा प्रकार घडला. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घडाळ्यासमोरील बटण दाबल्यास व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत दिल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या हा प्रकार तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे सुरुवातीला मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यामुळे गोंधळ वाढला. त्यानंतर यामध्ये पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे नवले गावात काल मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण होते. दहा-बारा तक्रारी आल्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इथले ईव्हीएम बदलण्यात आले. मात्र, तोवर सुमारे २९० मतदारांनी मतदान केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे नंतर वारंवार याबाबत मतदारांच्या तक्रारी आल्यानंतर संबंधीत मतदान केंद्रांवरील निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घडाळ्याला मतदान करताना ते कमळाला जात असल्याचं मान्य केलं. त्यानंतर हे ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:53 am

Web Title: when voter casting vote for ncp it had go to bjp candidate aau 85
Next Stories
1 मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही: निवडणूक आयोग
2 विजयाची घाई : निकालाआधीच तीन उमेदवारांनी फोडले फटाके
3 द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
Just Now!
X