News Flash

राणेंचा अपमान सहन करणार नाही

कोकणात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी राणेंचा भाजपामध्ये प्रवेश करण्यात आला आहे

नितेश राणे यांचे प्रतिपादन

सावंतवाडी : जुना—नवा असा कोणताही वाद न करता सर्वजण एकसंध राहून लढाई जिंकण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत केलेली विकास कामे, जनतेशी ठेवलेला संवाद या प्रमुख मुद्यांवर ही निवडणूक लढली जाईल, मात्र विरोधकांनी राणेंचा अपमान केल्यास कदापी सहन करणार नाही, असा इशारा कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांनी सोमवारी दिला.

कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात नितेश म्हणाले की, आता राणेंना डिवचण्याचा प्रयत्न  होत आहे. काहीजण राणेंना संपवण्याची भाषा करत आहेत. प्रचारासाठी  अवघे तेरा दिवस आपल्या हातात आहेत. कणकवलीतील सत्ता आपल्या हातात आहे. त्यामुळे एकदा लढाईला उतरल्यानंतर मागे वळून पाहण्याची गरज नाही.  प्रचारात माझ्यावर कोणी टिका केली तरी मी उत्तर देणार नाही. शिवसेनेच्या नेत्यांवर टिका करणार नाही. माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे.  गेल्या पाच वर्षांत जनतेच्या सुख-दुखा:त लोकांपर्यंत जात होतो. त्यामुळे भाजपात सर्वांना सन्मान मिळणार आहे.  प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्प, नाणार प्रकल्प यासह रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केला, असेही नितेश यांनी स्पष्ट केले.

कोकणात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी राणेंचा भाजपामध्ये प्रवेश करण्यात आला आहे, असे नमूद करून  भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले की,  २०२४ मध्ये कोकण विभागातील सर्व, पंधराही आमदार भाजपाचे होण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी  हा निर्णय घेतला आहे. आता ज्यांनी बंड केले आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व देण्याचा निरोप माझ्याकडे दिला आहे. त्यांनी वेळीच माघार घेतल्यास सन्मान होईल. नाहीतर विधानपरिषदेचा मीच आमदार होईन.

मी विकासासाठी राणेंशी हातमिळविणी केलेली आहे. ही लढाई ताकदीची होणार आहे. विरोधी उमेदवार सतीश सावंत यांना आपली शक्तीस्थळे माहिती आहेत. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असेही जठार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 5:07 am

Web Title: will not tolerate insult of the narayan rane says nitesh rane zws 70
Next Stories
1 भाजपचे प्रशांत ठाकूर सर्वात श्रीमंत उमेदवार
2 शेकापच्या जयंत पाटील यांच्यासह चार आमदारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
3 जिल्ह्य़ात १२ जागांसाठी  ११६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
Just Now!
X