News Flash

महाराष्ट्रातील भाजपाच्या सत्ता स्थापनेविरोधात दिल्लीत युवक काँग्रेस आक्रमक

सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन, घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस दाखल

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अगदी टोकाला पोहचला आहे. येथील नाट्यमय राजकीय घडामोडींचे आता देशाची राजधानी दिल्लीतही पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या आवारात आज काँग्रेसकडून निषेध मोर्चा काढण्यात आल्यानंतर, आता युवक काँग्रेसही आक्रमक झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या निषेधार्थ आज नवी दिल्ली येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला. सध्या घटनास्थळी मोठ्यप्रमाणावर पोलीस फौजफाटा दाखल झालेला आहे.

या अगोदर सकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात संसदेच्या परिसरात काढण्यात आलेल्या निषेध मोर्चा प्रसंगी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरत ‘अबकी बार बेईमानो की सरकार’ , ‘लोकशाहीची हत्या करणे बंद करा’ अशा घोषणा दिल्या होत्या. तर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला. यानंतर दुपारी लोकसभेचे कामकाज स्थिगित करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या करण्यात आली असल्याचा सरकारवर आरोप केला.

भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. सत्तास्थापनेसंदर्भात राज्यापालांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला. ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (२६ नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 2:35 pm

Web Title: youth congress workers hold protest against bjp led government formation in maharashtra msr 87
Next Stories
1 #LoksattaPoll: पुन्हा निवडणूक घेण्याची मनसेची मागणी योग्यच, ७२ टक्के जनतेचा पाठिंबा
2 नव्या कार्यकाळातील पहिल्या आदेशावर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही
3 पक्ष फुटीच्या उंबरठयावर असताना शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू सहकारी गप्प का ?
Just Now!
X